मोदी पक्के, काँग्रेस साधणार पराभवाची हॅट्ट्रिक

Modi-Pawar-Maharashtra यातून वैफल्य लक्षात येते

    दिनांक :03-May-2024
Total Views |
प्रासंगिक
 
 
- मोरेश्वर बडगे
Modi-Pawar-Maharashtra लोकसभा निवडणूक रंगात आली आहे. जोरदार चर्चा आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी या वेळेला हॅट्ट्रिक करणार का? सध्या हा रेकॉर्ड पंडित नेहरूंच्या नावावर आहे. नेहरू सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले होते. या विक्रमाची बरोबरी मोदी करणार का? मोदींनी स्वतःच जाहीर केल्याप्रमाणे भाजपा आणि त्यांची रालोआ ४०० पेक्षा अधिक जागा जिंकणार का? Modi-Pawar-Maharashtra  महाराष्ट्रात भाजपा आणि मित्रपक्षांनी ४५ पेक्षा अधिक जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. आरपारच्या या लढाईकडे मोदी विरुद्ध राहुल गांधी असे पाहिले जात आहे. विरोधकांकडे बोलायला मुद्देच नाहीत. विरोधी पक्षनेते निराश आहेत, हताश आहेत. मुद्देच नसल्याने कंबरेखालची भाषा बोलत आहेत. Modi-Pawar-Maharashtra महागाई, बेकारी असले बोथट झालेले मुद्दे विरोधी पक्ष चालवत आहेत. मोदींना घटना बदलायची आहे म्हणून त्यांना चारशे जागा हव्या आहेत, असे विरोधी नेते सांगतात. मात्र, त्यात दम नाही. डॉ. बाबासाहेब आले तरी घटना बदलणे शक्य नाही, असे खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्ट शब्दात सांगितले आहे. भाजपाने यावेळी आपल्या रणनीतीत थोडा बदल केला आहे.Modi-Pawar-Maharashtra
 
 

Modi-Pawar-Maharashtra 
 
 
गेल्या दोन निवडणुकींत नरेंद्र मोदी हाच भाजपाचा चेहरा होता. यावेळीही मोदींच्याच नावावर मतं मागितली जात आहेत. उमेदवाराकडे पाहू नका. तुमचं प्रत्येक मत मोदींनाच मिळणार आहे, असे ठासून सांगितले जात आहे. त्यामुळे तुम्ही पाहाल. भाजपाच्या जागा वाढतील. Modi-Pawar-Maharashtra चारसो पार तर होणारच. लोक मोदींना गेली दहा वर्षे पाहत आहेत. मोदीच देश सांभाळू शकतात, अशी लोकांची खात्री पटली आहे. आणखी पाच वर्षे देऊ नये, अशी कुठलीही गोष्ट त्यांच्या हातून घडलेली नाही. राहुल गांधी हे एक्स्पायरी डेट गेलेले नेते आहेत. घराण्याची परंपरागत अमेठीची जागा सोडून जो नेता केरळमध्ये सुरक्षित जागा शोधतो त्या राहुलबाबाला डोक्यावर घ्यायला देशाची जनता बुद्धूू नाही. Modi-Pawar-Maharashtra जे स्वतः सुरक्षित नाहीत ते जनतेला काय सुरक्षितता देणार? मोदींना हरवण्यासाठी गेली दहा वर्षे राहुल गांधींनी जंग जंग पछाडले. चौकीदार चोर है सांगून पाहिले. जमले नाही. यावेळी मोदींच्या विजयाच्या हॅट्ट्रिकसोबत राहुलबाबाच्या नेतृत्वात काँग्रेस पराभवाची हॅट्ट्रिक सेलिब्रेट करेल.
 
 
 
मोदींच्या नेतृत्वात आपण सुरक्षित आहोत, अशी लोकांमध्ये सुप्त भावना आहे. साधी भाजी घेताना माणूस चारदा विचार करतो. येथे तर पाच वर्षांचा मामला आहे. मोदींच्या रूपात मिळणारी गॅरंटीच रालोआकडे तिसèयांदा देशाची सत्ता देणार आहे.
मोदीही कुठली कसर बाकी ठेवायला तयार नाहीत. या आठवड्यात मोदी महाराष्ट्रात होते. दोन दिवसांत मोदींनी तब्बल सहा सभा केल्या. विरोधक यात वेगळी हवा शोधत आहेत. त्यांना वाटते मोदी घाबरले. Modi-Pawar-Maharashtra पण मोदींचा तो स्वभाव नाही. कोणतेही काम हातात घेतले तर जास्तीत जास्त रिझल्ट देण्यावर त्यांचा भर असतो. उत्तर प्रदेशनंतर सर्वाधिक ४८ जागा महाराष्ट्रात आहेत. एकेक जागा मोदींनी प्रतिष्ठेची केली आहे. त्यामुळे मोदींचा मुक्काम वाढलेला दिसतो. त्या पलीकडे कोणी वेगळा अर्थ काढू नये. पण मोदींनी ज्या सभा केल्या त्यांनीही विरोधकांची पंढरी घाबरली आहे. तुल्यबळ विरोधी पक्ष आहे कुठे? शिल्लक राष्ट्रवादीचे शरद पवार आणि शिल्लक शिवसेनेचे उद्धव ठाकरे उसना आवेश आणतात खरे ! Modi-Pawar-Maharashtra दिवा विझण्याआधी फडफडतो, असे म्हटले जाते. तशी या दोघांची फडफड सुरू आहे. महाराष्ट्राने खूप निवडणुका पाहिल्या. मात्र, या निवडणुकीत बोलली जातेय् तेवढी शिवराळ भाषा महाराष्ट्राने कधी ऐकली नव्हती.
 
 
 
 
कन्यामोहापोटी शरद पवार बारामतीत अडकले आहेत. उद्धव ठाकरे मोकळे आहेत. मोदींच्या रेसकोर्सवर झालेल्या सभेवर त्यांनी ज्या शिवराळ भाषेत टीका केली ती महाराष्ट्राची नक्कीच संस्कृती नाही. रेसकोर्सच्या सभेत घोडे नव्हते, गाढवं होती, असे उद्धव म्हणाले. देवेंद्र फडणवीसांना पुन्हा टरबूज म्हटले. मी नागपुरी आहे, त्यांच्यापेक्षाही खाली जाऊ शकतो, अशा शब्दात फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना फटकारले, हे चांगले झाले. Modi-Pawar-Maharashtra नागपूरच्या शिव्या मुंबईच्या लोकांना ठाऊक नसतील. पण त्या सुरू झाल्या तर एके ४७ ही लाजते. पण, उद्धव अशीच शिवराळ भाषा बोलणार. आधी ते खोके खोके बोलत होते. त्यातून त्यांचे वैफल्य लक्षात येते. आता बोलायला मुद्दाच नाही. खोके मुळात नव्हतेच. त्यामुळे आता काय बोलायचे? तर शिवराळ भाषा सुरू आहे. कधी टरबूज म्हणतात तर कधी कलंक म्हणतात. खरे तर ही मेंटल हॉस्पिटलची केस आहे. बाळासाहेब ठाकरे नावाचा मोठा ब्रँड हातून गेला. पक्ष गेला, चिन्ह गेलं, मुख्यमंत्रिपद गेलं. सहकारी सोडून जात आहेत. परवा ठाकरेंच्या खास विश्वासातले रवींद्र वायकर गेले. आज शिंदे गटाचे उमेदवार आहेत. तुम्ही लिहून ठेवा. निवडणुकीनंतर फक्त मी व माझे कुटुंब अशी ठाकरेंची अवस्था असेल.Modi-Pawar-Maharashtra
 
 
 
 
उद्या मोदी येतील तेव्हा भाजपामध्ये घुसण्यासाठी याच शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यात धक्काबुक्की होईल. शरद पवार म्हणा की उद्धव ठाकरे, दोघेही एकाच माळेचे मणी आहेत. मोदींनी शरद पवारांचे नाव न घेता त्यांचा उल्लेख भटकती आत्मा असा केला. इतक्या नेमक्या शब्दात पवारांचे वर्णन कोणी केले नसेल. गेली ४५ वर्षे घुटमळणाऱ्या या असंतुष्ट आत्म्याने महाराष्ट्राचे राजकारण अस्थिर करून ठेवले, असे मोदी म्हणाले. Modi-Pawar-Maharashtra शेतमालाला भाव मिळत नाही म्हणून माझा आत्मा असंतुष्ट आहे, असे पवार म्हणाले. पवार तब्बल दहा वर्षे केंद्रात कृषी मंत्री होते. काही केले नाही. भाजपा-शिवसेना युतीला बहुमत मिळाले असताना उद्धव ठाकरे यांना अडकवून युतीत फूट पाडली. पवारांना कोणाचं काही चांगलं चालू असेल तर ते बघवत नाही. २०१४ साली याच पवारांनी मागितला नसताना फडणवीसांना सरकार बनवण्यासाठी बिनशर्त पाठींबा जाहीर केला होता. पवार वाट्टेल ते बोलतात आणि मीडियावाले त्याला पवारांची गुगली म्हणतात. मोदींनी ही गुगली फोडून काढली. चांगले झाले.
 
 
 
 
Modi-Pawar-Maharashtra सोनाराच्या हातून कान टोचले. हा असंतुष्ट आत्मा सध्या आपल्या मुलीला निवडून आणण्यासाठी भटकतो आहे. त्यासाठी त्याने घरच्या सुनेला परकी ठरवले. बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांच्याविरोधात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार उभ्या आहेत. पवार कुटुंबातच सत्तेचे महाभारत सुरू आहे. याच सुप्रिया सुळे यांनी दोन वर्षांपूर्वी ‘अकेला देवेंद्र क्या करेगा?' असे म्हटले होते. हा अकेला काय काय करू शकतो ते फडणवीसांनी दाखवून दिले. लोक तर दूर, आज घरच्या सावल्याही त्यांच्यासोबत नाहीत. नियती उधारी ठेवत नाही. Modi-Pawar-Maharashtra याच जन्मात हिशोब चुकवते. दस्तुरखुद्द राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठींबा जाहीर केला आहे. राज ठाकरे यांच्याशी सामना आहे. उद्धव ठाकरे उठसुठ मुंबईवर हक्क सांगत होते. आता मुंबई कोणाची? याचाही निकाल ४ जूनलाच लागलेला असेल.