‘एग सेल स्कल'!

What is Eggshell skull rule रुग्णासाठी जास्त घातक

    दिनांक :03-May-2024
Total Views |
वेध 
 
 
 
- संजय रामगिरवार
What is Eggshell skull rule शीर्षकावरून ‘एग सेल स्कल' ही कुठल्यातरी व्यंजनाची रेसिपी असेल असे वाटणे स्वाभाविक आहे, पण तसे अजिबात नाही. कारण, हा कायद्याचा एक नियम आहे. What is Eggshell skull rule हा नियम काय आहे, सध्या तो चर्चेत असण्याचे कारण काय, सर्वाेच्च न्यायालयाने त्याबाबत काय म्हटले आहे आदी प्रश्नांच्या चर्चेसाठीच हा प्रपंच ! २३ एप्रिल रोजी सर्वोच्च न्यायालयाने एका याचिकेवर निकाल देताना समोर आलेला मुद्दा हा ‘एग सेल स्कल' नियमांतर्गत येत नाही, असे म्हटले आहे. What is Eggshell skull rule हा नियम वाढीव नुकसान भरपाई मागण्यासाठी पुढे केला जातो. जी याचिका सर्वोच्च न्यायालयासमोर आली त्यातून घडलेला प्रकार हा गंभीर वैद्यकीय दुर्लक्षिततेचा विषय होता, ज्यासाठी जिल्हा ग्राहक मंचाने ५ लाखाची नुकसान भरपाई देण्याचा आदेशही दिला होता.
 
 

What is Eggshell skull rule 
 
 
२००५ मध्ये हिमाचल प्रदेशच्या मंडी जिल्ह्यातील रहिवासी ज्योती देवी यांना ‘अपेंडिक्स सर्जरी'साठी एका दवाखान्यात भरती करण्यात आले होते. What is Eggshell skull rule त्यांच्यावर उपचार झालेत. मात्र दुखणे काही थांबत नव्हते. चार वर्षे त्यांनी त्या यातना सहन केल्या. विविध दवाखान्यांमध्ये उपचार घेतले. शेवटी चंडीगड येथील ‘पोस्ट ग्रॅज्युएट इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स' येथे तपासणीअंती ज्योती देवी यांच्या पोटात अडीच सेंटीमीटरची एक सुई राहून गेल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यांना दुसरी सर्जरी करणे भाग होते. संबंंधित दवाखान्यातील डॉक्टरांच्या दुर्लक्षितपणाचा हा परिपाक असल्याने ज्योती देवी यांनी जिल्हा ग्राहक मंचाकडे धाव घेतली आणि दुसऱ्या सर्जरीसाठी नुकसान भरपाई मागितली. मंचाने ५ लाखाचा मोबदला मान्यही केला. What is Eggshell skull rule परंतु, संबंधित दवाखान्याने मंचाच्या आदेशाविरुद्ध अपील केली. राज्य ग्राहक मंचाने नुकसान भरपाईची रक्कम कमी करून १ लाख रुपये देय ठरवली.
 
 
 
शेवटी विषय राष्ट्रीय ग्राहक विवाद निवारण आयोगाकडे गेला. आयोगाने नुकसान भरपाईची रक्कम वाढवून २ लाख रुपये केली. परंतु, हा निर्णय ज्योती देवी यांना मान्य नसल्याने त्यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे धाव घेतली आणि ‘एग सेल स्कल' नियमानुसार २० लाख रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी केली. What is Eggshell skull rule ‘एग सेल स्कल' नियम असे सांगतो की, एखादी व्यक्ती विशिष्ट परिस्थितीत असेल. त्यांना शरीराच्या ज्या भागात आधीच काहीतरी कमजोरी असेल त्या भागात कुणीतरी इजा करण्याचा प्रयत्न केल्यास आणि त्यामुळे पीडिताचे दुःख किंवा त्रास वाढला असल्यास ती व्यक्ती जास्तीची नुकसान भरपाई मागू शकते. ज्यांच्यामुळे पीडितास जास्तीचा त्रास झाला त्या व्यक्तीला रुग्णाची विशिष्ट स्थिती माहीत असो की नसो, तरीही त्या व्यक्तीला पीडितास किंवा रुग्णास वाढीव नुकसान भरपाई ही द्यावीच लागेल, असा हा नियम आहे.
 
 
 
What is Eggshell skull rule अधिक स्पष्ट करताना असे सांगितले जाते की, पीडित व्यक्तीच्या डोक्याच्या टणक भागावर कुणीतरी वार केला. मात्र, त्या व्यक्तीच्या डोक्याचा भाग टणक नसून तो अंड्याच्या सालीप्रमाणे नाजुक असेल, तर जरी वार कमी घातक असला तरी संबंधित रुग्णासाठी तो जास्त घातक ठरतो आणि अशावेळी नुकसान भरपाईची रक्कम अधिकची मागण्याचा अधिकार त्या पीडित रुग्णास असतो. नियमाचे स्पष्टीकरण करताना अंड्याची उपमा दिली गेल्यानेच या नियमास ‘एग सेल स्कल' असे नाव पडले आहे. What is Eggshell skull rule ज्योती देवी यांच्या केसमध्ये मात्र सर्वोच्च न्यायालयाने हे अमान्य केले की, त्यांची स्थिती आधीच वाईट होती. मात्र, त्याचवेळी हे मान्य केले की संबंधित डॉक्टरांच्या दुर्लक्षितपणामुळे त्यांना त्रास झाला आणि त्यांचे नुकसान झाले आणि त्यामुळे जिल्हा ग्राहक मंचाने त्यांना देऊ केलेली पाच लाखाची रक्कम ही संबंधित दवाखान्याने दिलीच पाहिजे, असा निर्वाळा न्यायालयाने दिला.
 
 
 
खरे तर, या नियमाची उत्पत्ती ही १८९१ मध्ये अमेरिकेतील विस्कॉन्सिन या ठिकाणी वोसबर्ग विरुद्ध पुटनी प्रकरणी झाली. पुटनी नामक १२ वर्षाच्या मुलाच्या पायावर १४ वर्षीय वोसबर्ग याने लात मारली होती. What is Eggshell skull rule हा सामान्य विषय असला तरी पुटनीच्या पायाला आधीच ईजा असल्याने वोसबर्ग याच्या प्रहारामुळे पाय मोडला. वोसबर्ग यास आधीच्या ईजेबाबत माहिती नव्हती तरीही या नियमानुसार न्यायमूर्ती विलियम पी. लियोन यांनी एकूण घडलेल्या गंभीर घटनेसाठी वोसबर्ग यास दोषी ठरवले आणि मोठ्या नुकसान भरपाईचे आदेश दिले. What is Eggshell skull rule हिंसाचाराला आळा घालण्यासाठी आणि कुठल्याही लहानशा घटनेतूनही गंभीर विषय उद्भवू शकतो आणि त्यासाठी आरोपीस मोठी किंमत चुकवावी लागू शकते, हे स्पष्ट करणारा हा नियम समाजासाठी योग्य मानला पाहिजे.
९८८१७१७८३२