पिक विम्याची नुकसान भरपाई द्या !

    दिनांक :03-May-2024
Total Views |
(भेंडाळा येथील शेतकर्‍यांची जिल्हाधिकार्‍यांकडे निवेदनातून मागणी)
आष्टी, 
crop insurance चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा येथील शेतकर्‍यांनी माहे 25 नोव्हेंबर ते 7 डिसेंबर 2023 दरम्यान भात पिकाचे नुकसान झालेल्या प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत नुकसान भरपाई देण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनातून केली आहे.निवेदनात म्हटले आहे की, आम्ही सर्व शेतकरी बांधव प्रधानमंत्री फसल विमा योजने अंतर्गत शेतीचा (भात पिक) पिक विमा काढलेला होता. माहे 25 नोव्हेंबर ते 7 डिसेंबर 2023 दरम्यान आमच्या पिकाची धान कापणी झालेली होती. त्यावेळी 25 नोव्हेंबर ते 7 डिसेंबर 2023 दरम्यान अवकाळी पाऊस आल्याने आमच्या पिकाचे नुकसान झाले. त्यामुळे आम्ही सर्व शेतकरी रिलांयन्स पिक विमा कंपनीकडे पिकाच्या नुकसानीबद्दल तक्रार दाखल केली.
 

erer 
crop insurance त्यानंतर पिक विमा कंपनीचे अधिकारी हे 1 महिन्यानंतर पंचनामा करण्यासाठी आले. पंरतु त्यावेळी त्याठिकाणी त्यांना कुठलेही नुकसान दिसलेले नाही. कारण आमच्या धानाची कापण व बांधण आपापल्या परीने धान सुकवुन जमा करुन झालेले होते. त्यावेळी आम्हा शेतकर्‍यांच्या धान पिकाचे 80 टक्के नुकसान झालेले असुन अजुनपर्यंत आम्हाला पिक विम्याचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे रिलायन्स पिक विमा कंपनीकडून नुकसान झालेल्या सर्व शेतकर्‍यांची योग्य चौकशी करुन प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा लाभ मिळवून द्यावा, अशी मागणी जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनातून शेतकर्‍यांनी केली आहे.