कट्टरपंथी युवकाचे भगवान मुरुगनच्या पुतळ्यासमोर कुराण पठन

मलेशियातील प्रकाराने हिंदूंमध्ये संताप, जागतिक स्तरावरही निषेध

    दिनांक :31-May-2024
Total Views |
जर्मनीस्थित कट्टरपंथी वहाबी सोशल मीडिया प्रभावक अब्देललतिफ ओईसा याने हिंदूंची पूज्य देवता Lord Murugan भगवान मुरुगन यांच्या बाटू लेणी येथील मूर्तीसमोर मूर्तिपूजेविरोधातील कुराणाची एक आयत वाचतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. मलेशियात घडलेल्या या प्रकारामुळे तेथील हिंदूजनमानस खवळले असून याची तीव्र प्रतिक्रिया जगभरातील हिंदूंमध्येही उमटली आहे. मूर्तिपूजेवर टीका करणारा हा व्हिडीओ टिकटॉकवर लाखो लोकांनी तर इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हजारो वापरकर्त्यांनी पाहिला. वहाबी कट्टरपंथी अब्देललतिफ ओईसा हा कुणी साधासुधा माणूस नाही. सोशल मीडियावर त्याचा मोठा प्रभाव आहे. जगभरातील लक्षावधी कट्टरवादी मुसलमान त्याच्या पोस्ट आवर्जून वाचतात आणि त्याने प्रसारित केलेले व्हिडीओ देखील पाहतात. मुस्लिम जनमानसावर, खासकरून कट्टरपंथी युवकांवर त्याचा मोठा प्रभाव आहे. त्याने मलेशियातील मुरुगनच्या मूर्तीसमोर जे केले त्यावर हिंदू समुदायाकडून तीव्र टीका केली जात आहे.
 
 
Lord-Murugan
 
बाटू लेणी येथील भगवान मुरुगन मंदिर हे जगभरातील हिंदूंसाठी एक महत्त्वपूर्ण धार्मिक स्थळ आहे. या गुफेतील भगवान मुरुगनची अतिशय भव्य अशी मूर्ती आणि प्रभावशाली आणि देखणे गुहा मंदिर हे वास्तुकलेसाठी प्रसिद्ध आहे. या आकर्षक स्थानाला दरवर्षी जगभरातील लाखो पर्यटक भेट देतात. 19 मे रोजी, अब्देललतिफ ओईसाने या स्थानाला भेट दिली आणि एक टिकटॉक व्हिडीओ रेकॉर्ड केला. यात त्याने भगवान मुरुगन यांच्या मूर्तीसमोर उभे राहात मूर्तिपूजेविरोधातील कुराणाची एक आयत वाचली. अब्देललतिफने वाचलेल्या आयत (श्लोक) चा अर्थ असा आहे : इब्राहिम (अब्राहम) म्हणाले, ‘‘मग तुम्ही अल्लाशिवाय अशा गोष्टींची पूजा, उपासना करता, जी तुम्हाला नफाही देऊ शकत नाही आणि नुकसानही करू शकत नाही? तुमचा आणि अल्लाऐवजी तुम्ही ज्याची उपासना करीत आहात त्याचा धिक्कार असो.’’ कुराणातील ही आयत पठण करतेवेळी अब्देललतिफने Lord Murugan  भगवान मुरुगनच्या मूर्तीकडे अपमानजनक पद्धतीने, अनादराने बोट दाखवले. ‘केवळ अल्लाची पूजा करावी, मूर्तीची नाही’ असा त्याच्या या कृतीचा अर्थ होता. अब्देललतिफने आणखी एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे, ज्यामध्ये तो मंदिराच्या आवारात पर्यटकांना कुराणातील आयत वाचताना, ऐकवताना दिसतो. या व्हिडीओंमुळे नेटकर्‍यांनी सोशल मीडियावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. मोठ्या संख्येत हिंदूंनी धार्मिक भावना दुखावल्याबद्दल अब्देललतिफ ओईसावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्याची अशी, विशेषत: धार्मिक महत्त्वाच्या ठिकाणची कृती भाविकांचा अपमान- अनादर करणारी आणि प्रक्षोभक आहे, असे टीकाकारांचे स्पष्ट मत आहे.
 
 
हिंदूफोबिक व्हिडीओविरोधात सोशल मीडियात संताप
अब्देललतिफ ओईसा याने हिंदूंना अपमानित करण्याच्या उद्देशाने पोस्ट केलेला दुर्भावनापूर्ण व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला जात आहे. यामुळे संतप्त झालेले हिंदू व्हिडीओच्या कमेंट सेक्शनमध्ये आपला तीव्र संताप व्यक्त करीत आहेत. ‘हे मानसिकदृष्ट्या आजारी लोक अशा गोष्टी का करतात? जर तुम्हाला इतर लोकांच्या पवित्र ठिकाणी येण्याची परवानगी असेल, तर त्यांचे नियम आणि कायदे पाळा. तुम्ही लोक असे का करीत नाही? कल्पना करा की, जर कोणी आपल्या पवित्र स्थानावर अशाप्रकारचीच एखादी (प्रक्षोभक) कृती केली, अर आपल्याला कसे वाटेल’, असे नेटिझन अभिषेक सिंह यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
 
 
Lord Murugan : डेनिसन नामक एका इंस्टाग्राम वापरकर्त्याने अब्देललतिफच्या व्हिडीओला उत्तर देताना म्हटले आहे की, ‘हिंदू धर्मात मुरुगन यांना ईश्वराचा अवतार मानले जाते. आम्ही देखील अनेकत्वात एकत्व पाहतो व देवाशिवाय दुसर्‍या कुणाची पूजा करीत नाही. दुसर्‍यांच्या आस्थेचा अनादर करणार्‍यांनो, मलेशियातून तातडीने चालते व्हा!’
‘तुम्ही मलेशियाला आला आहात; तुम्हाला येथील बहुविध संस्कृती आणि धर्माचा आदर करणे आवश्यक आहे. अज्ञानात राहणे बंद करा’, असे मलेशियातील एक हिंदू रणरागिणी गुणाशेखरनने सोशल मीडियावरून सुनावले.
 
 
हिंदूंच्या भावना दुखावल्याबद्दल अब्देललतिफचा निषेध केवळ हिंदूंनीच केला असे नाही तर मुस्लिमांनीही त्याच्या व्हिडीओला सणसणीत प्रत्युत्तर दिले. इंस्टाग्राम वापरकर्ता अर्शदने उत्तर दिले, ‘खूप वाईट व खालच्या पातळीची वर्तणूक, भाई! मुस्लिमांकडून ही अपेक्षा करू नका. प्रसिद्धी मिळविण्यासाठी तुम्ही धर्म किंवा संस्कृतीकडे बोट दाखवू शकत नाही आणि लोकांमध्ये द्वेष पसरवू शकत नाही. हे हराम आहे. एखाद्याच्या भावना दुखावणे हराम आहे आणि सर्वांचा आदर करणे इस्लाम आहे’. एक्स हँडल युजर इन्कॉग्निटोने स्वत:च्या ‘एक्स’ पेजवर एक व्हिडीओ शेअर केला आणि परराष्ट्र मंत्री आणि मलेशियाचे पंतप्रधान इब्राहिम अन्वर यांना टॅग केले व हिंदूंच्या भावना जाणूनबुजून दुखावल्याबद्दल अब्देललतिफ ओईसावर कारवाई करण्याची मागणी केली.
 
 
कोण आहे अब्देललतिफ ओईसा?
Lord Murugan : मूळचा मोरोक्कोचा असलेला अब्देललतिफ ओईसा सोशल मीडिया प्रभावक (इन्फ्लूएन्झर) असून सध्या त्याचे वास्तव्य जर्मनीत आहे. अब्देललतिफ ओईसा हा सोेशल मीडियावरील विविध क्रियाकलापांसाठी ओळखला जातो. त्याच्या टिकटॉक पेजवर 70 लाखांहून अधिक लाईक्स आहेत तर इंस्टाग्रामवर पाच लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत आणि त्याच्या ‘अब्देन ट्यूब’ या यूट्यूब चॅनेलचे दोन लाखांहून अधिक सबस्क्रायबर्स (सदस्य) आहेत. तो फेसबुक आणि स्नॅपचॅटवरही सक्रिय आहे. गर्दी असलेल्या रस्त्यांवर कुराणाच्या आयतांचे मोठमोठ्याने पठण करणे, इतर धार्मिक प्रभावशाली लोकांसमवेत वादविवाद कार्यक्रमात भाग घेणे, गैर-मुस्लिमांना कुराण ऐकण्यासाठी प्रोत्साहित करणे आणि गैर-मुस्लिमांमध्ये धर्मांतराला प्रोत्साहन देणे इत्यादी विविध ‘उद्योग’ अब्देललतिफ ओईसा आपल्या सोशल मीडिया माध्यमातून करीत असतो. त्याच्या आक्रमक व कट्टरवादी पोस्ट आणि व्हिडीओंमुळे अनेक देशात वाद व तणाव उत्पन्न झाला आहे.
 
 
Lord Murugan : अब्देललतिफ ओईसाने मलेशियातील बाटू लेणी मंदिरातील भगवान मुरुगन यांच्या मूर्तीसमोर कुराणातील आयतांचे पठण करतानाचा व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर सर्वत्र संताप पसरला. मूर्तिपूजेवर टीका करणारा हा व्हिडीओ टिकटॉक, इंस्टाग्राम आणि फेसबुकवर लक्षावधी लोकांनी पाहिला. यावर जागतिक स्तरावरील हिंदू समुदायाकडून तीव्र टीका करण्यात आली. अब्देललतिफ लंडन, बर्लिन, पॅरिस आणि डसेलडॉर्फ सारख्या प्रमुख युरोपियन शहरांमध्ये आपले ‘कल्याणकारी उपक्रम’ राबवतो! अनेकदा आफ्रिकन आणि मध्य पूर्व देशांमध्ये त्याचा प्रवास असतो. तो अब्देन अकादमी नावाची ऑनलाईन अकादमी देखील चालवत असून ज्यामध्ये अरबी भाषा, कुराण पाठ करणे (मेमोरिझेशन) आणि दोन वर्षांचा ऑनलाईन हाफिज अभ्यासक्रम उपलब्ध आहे. याव्यतिरिक्त, तो पारंपरिक मोरोक्कन आणि अमिराती पोशाख, तकिया टोपी, अरब स्कार्फ, मिस्वाक आणि मुस्लिम धर्माशी संबंधित वस्तू विकण्याचे एक ‘आभासी दुकान’ देखील चालवतो.
 
 
थोडक्यात ‘इस्लामी संस्कृतीचा’, पंथाचा, कट्टरवादाचा प्रचार व प्रसार करणे व धर्मांध लोकांना चिथावणी देणे, मूर्तिपूजेविरुद्ध सातत्याने द्वेषयुक्त प्रचार करणे आणि गैरमुस्लिम लोकांमध्ये भय, दहशत निर्माण करणे हेच अब्देललतिफ ओईसाचे प्रमुख ‘उद्योग’ आहेत.
 
 
Lord Murugan : मलेशियामध्ये मोठ्या संख्येत हिंदूंचे वास्तव्य आहे. टक्केवारीत सांगायचे झाल्यास या देशातील हिंदू लोकसंख्या सहा टक्क्यांहून अधिक आहे, ज्यात बहुसंख्य तामिळ आहेत. अलिकडे, मलेशियातील कट्टरपंथी इस्लामी घटकांनी धर्मांतरासाठी हिंदू लोकसंख्येला अधिकाधिक लक्ष्य केले आहे. 2023 मधील घटना तर अभूतपूर्व होती. मलेशियाच्या पंतप्रधानांनी सेलंगोर राज्यातील एका मशिदीत शुक्रवारच्या नमाजानंतर एका हिंदू तरुणाला खुलेआम इस्लाममध्ये धर्मांतरित केले होते. यामुळे मलेशियातच नव्हे तर संपूर्ण दक्षिण-पूर्व आशियातही खळबळ उडाली होती. हिंदू समुदाय संतप्त झाला होता. या घटनेची मलेशियातील माध्यमांनी गांभीर्याने दखल घेऊन ठळकपणे धर्मांतराचे वृत्त दिले होते. मात्र, तामिळनाडूतील मुख्य राजकीय पक्षांनी अब्देललतिफच्या ‘त्या’ कृत्याचा निषेध का केला नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. वास्तविक तामिळनाडूतील काही राजकीय पक्ष मुरुगन यांना तामिळ लोकांचा देव मानतात. अब्देललतिफने भगवान मुरुगन यांच्या मूर्तीसमोर कुराणातील आयते वाचण्याचा उद्योग केल्यानंतर मलेशियातील तणाव वाढला. तरी द्राविडी पक्षांनी या घटनेचा निषेध का केला नाही? कारण अतिशय स्पष्ट आहे. हिंदू विरोधी द्रविड संघटना कट्टरपंथी मुस्लिम गटांच्या सहकार्याने हिंदू समुदायाला अधिकाधिक लक्ष्य करीत आहेत, विशेषत: धर्मांतराच्या उद्देशाने मूर्तिपूजाविरोधी प्रसारावर लक्ष केंद्रित करीत आहेत.
 
 
Lord Murugan ‘करुंचट्टई इलंगर पडाई’ (ब्लॅक शर्ट यूथ आर्मी) ही एक हिंदुत्वविरोधी द्रविडियन संघटना आहे. या संघटनेने मलेशिया द्रविडर कळघमच्या सहकार्याने वादग्रस्त आंतरराष्ट्रीय युवा बुद्धिवाद मंच-2023 चे (International Youth Rationalism Forum-2023) आयोजन केले होते. 24 डिसेंबर रोजी क्वालालंपूर आणि सेलंगोर चायनीज असेंब्ली हॉल येथे प्रखर हिंदू विरोधी नेते ई. व्ही. रामास्वामी पेरियार (नायकर) यांच्या 50 व्या पुण्यतिथीच्या स्मरणार्थ विशेष परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या परिसंवादातील प्रमुख वक्ते भारतातील तामिळनाडू तसेच मलेशिया, कॅनडा, अमेरिका आणि श्रीलंका येथील पेरियारवादी गट आणि हिंदू विरोधी विद्यार्थी संघटनेचे युवा सदस्य होते. तर परिसंवादाच्या सहआयोजकांमध्ये मलेशिया द्रविडर कळघम, मंथनेय द्रविडर कळघम, मलेशिया तमिझार तनमाना पेरियाक्कम, पेरा स्टेट पेरियार पासराई, पेरियार नरपानी मंद्रम आणि तमिझ नेरी कळघम यांचा समावेश होता.
 
 
या परिसंवाद/ चर्चासत्राला मलेशियातील हिंदू संघटनांनी तीव्र विरोध केला. 20 डिसेंबर रोजी, हिंदू सेवा संगम आणि मलेशिया हिंदू धर्म ममंद्रमसह 27 हिंदू संघटनांच्या संघाने या घटनेचा निषेध करण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित केली आणि मलेशियाच्या गृह मंत्रालयाकडे या परिसंवादावर बंदी घालण्याची मागणी केली. अखेर हिंदुत्ववादी संघटनांच्या तीव्र विरोधांमुळे माय स्किल कॉलेजमध्ये होणार्‍या या परिसंवादाची जागा बदलून क्वालालंपूर आणि सेलंगोर चायनीज असेंब्ली हॉलमध्ये स्थानांतरित करण्यास भाग पाडले गेले. हिंदू नेत्यांनी चर्चासत्राच्या अजेंड्याबद्दल चिंता व्यक्त केली, ज्यामुळे धार्मिक तणाव आणखी वाढून हिंदूविरोधी भावनांना बळ मिळू शकते, असा इशारा दिला. हिंदू नेत्यांनी मलेशियाच्या विविध धार्मिक समुदायांमध्ये ऐक्य आणि आदर असण्याच्या गरजेवर भर दिला आणि अशा फुटीरतावादी घटना रोखण्यासाठी मलेशियाच्या अधिकार्‍यांना कठोर पावले उचलण्याची विनंती केली.
 
 
Lord Murugan : एका व्हायरल व्हिडीओमध्ये एका मलेशियन हिंदू व्यक्ती हिंदूविरोधी चर्चासत्राचा निषेध करीत असताना दिसत आहे. यामुळे कार्यक्रमासंदर्भातील वाद अधिकच वाढला. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर प्रसारित झालेल्या व्हिडीओत, करुंचट्टई इलंगर पडाई आणि मलेशिया द्रविडर कळघम यांनी आयोजित केलेल्या इंटरनॅशनल यूथ रॅशनॅलिझम फोरम-2023 ला ही हिंदू व्यक्ती तीव्र विरोध दर्शविताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये, ती व्यक्ती म्हणते, ‘लिव्ह इन रिलेशनशिप’चा प्रचार करणारे, याचे उघड समर्थन करणारे व आमच्या मुली आणि मुलांचे आयुष्य खराब करणारे हे पेरियारवादी गट आम्हाला मुळीच नकोत. अशा प्रकारचे सेमिनार/परिसंवाद हे धर्मांतराच्या दिशेने पहिले पाऊल आहे. हा परिसंवाद कोणत्याही परिस्थितीत थांबवावा आणि मलेशियाच्या गृहमंत्रालयाने या आयोजकांना ताबडतोब अटक करावी’. मलेशियातील हिंदू संघटनांनी यापूर्वीच या परिसंवादाला तीव्र विरोध दर्शविल्याने आयोजकांना याची जागा बदलावी लागली होती.
 
 
Lord Murugan : दरम्यान, तामिळनाडूमध्ये, द्रविड, नक्षलवादी आणि अल्पसंख्यक गटांकडून धार्मिक आणि सामाजिक सलोखा वाढविण्याच्या नावाखाली हिंदू सण, परंपरा आणि चालीरीती दुर्बळ करण्याचा प्रयत्न सुरू आहे. समानता पोंगल सारखे उपक्रम, ज्यात मुस्लिम हिंदू सणात भाग घेतात. यामुळे वादाला तोंड फोडले आहे. असे उपक्रम सुसंवाद वाढवतात, असा या पुरोगामी, सेक्युलर बुद्धिवाद्यांचा युक्तिवाद आहे. मात्र, रमजान किंवा ख्रिसमससाठी कोणतेही समतुल्य उत्सव नाहीत. याव्यतिरिक्त, मंदिराच्या उत्सवादरम्यान, काही मुस्लिम गटांनी हिंदू भाविकांना अल्पोपहार देण्यास सुरुवात केली आहे. सद्भावना वाढवण्याच्या उद्देशाने, काही लोक या कृतींकडे मुस्लिम हिंदूंना विरोध करतात ही धारणा कमी करण्याचा प्रयत्न म्हणून पाहत आहेत. समीक्षक मशिदी आणि चर्च परिसरात हिंदू धार्मिक मिरवणुकांना होणारा विरोध देखील अधोरेखित करतात आणि ते दुहेरी मानक असल्याचे नमूद करतात.
 
 
Meanwhile, in Tamil Nadu, there have been ongoing attempts by Dravidian, Naxal, and minority groups to undermine Hindu festivals and customs under the guise of promoting religious and social harmony. Initiatives like Equality Pongal, where Muslims participate in the Hindu festival, have sparked controversy. Critics argue that while such initiatives promote harmony, there are no equivalent celebrations for Ramzan or Christmas. Additionally, during temple festivals, some Muslim groups have begun offering refreshments to Hindu devotees. While intended to foster goodwill, these actions are viewed by some as attempts to mitigate the perception that Muslims oppose Hindus. Critics also highlight the opposition to Hindu religious processions in mosque and church localities, citing it as a double standard.
(ऑर्गनायझरवरून साभार)