रणबीर कपूरचा 'रॉकस्टार' चित्रपट थिएटरमध्ये पुन्हा प्रदर्शित

31 May 2024 12:35:19
मुंबई,   
Rockstar movie रणबीर कपूरची फॅन फॉलोइंग नेहमीच चांगली राहिली आहे. त्याच्या चित्रपटांच्या प्रदर्शनाची चाहत्यांना नेहमीच उत्सुकता असते. तुम्ही अजूनही  रणबीर कपूरचा 'रॉकस्टार' हा चित्रपट बघितला   नसेल तर तुम्ही हा चित्रपट आता  थिएटरमध्ये बघू शकत . कारण रणबीर आणि नर्गिस फाखरी स्टारर 'रॉकस्टार' चित्रपट पुन्हा एकदा थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. रणबीरच्या चित्रपटासोबतच शाहिद कपूर आणि करीना कपूर स्टारर चित्रपट 'जब वी मेट' आणि रणबीरचा आणखी एक चित्रपट 'तमाशा' एकाच वेळी थिएटरमध्ये पुन्हा प्रदर्शित झाला आहे.
 
Rockstar movie
 
मीडिया रिपोर्ट्सनुसार, चित्रपटाचे प्रदर्शन निवडक थिएटरमध्ये टोकन रिलीज म्हणून सुरू झाले. रिलीज झाल्यापासून या चित्रपटाने भारतात बॉक्स ऑफिसवर 1 कोटी रुपयांची कमाई केली आहे. रणबीर कपूरचे चाहते त्याच्या प्रत्येक चित्रपटाच्या प्रदर्शनाची किंवा पुन्हा प्रदर्शित होण्याची आतुरतेने वाट पाहत असतात. Rockstar movie त्यामुळेच चाहत्यांच्या सततच्या मागणीमुळे 'रॉकस्टार' चित्रपट पुन्हा प्रदर्शित करण्यात आला. सध्या फक्त दोन आठवडे चित्रपटगृहांमध्ये 'रॉकस्टार' चालवण्याची योजना आहे. सिनेमागृहांमध्ये तिकिटांच्या दरांवर नियंत्रण असूनही 1 लाखांहून अधिक लोक चित्रपट पाहण्यासाठी आले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तिकीट विक्रेत्यांनी दोन आठवड्यात सुमारे 1.10 लाख तिकिटांची विक्री केली. विशेष म्हणजे हा चित्रपट आता तिसऱ्या आठवड्यातही पाहिला जात आहे.
रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोण यांचा 'तमाशा' आणि शाहिद कपूर आणि करीना कपूरचा 'जब वी मेट' हे चित्रपट 'रॉकस्टार'सोबत एकाच वेळी थिएटरमध्ये पुन्हा प्रदर्शित झाले. पण या दोघांनाही 'रॉकस्टार'च्या आकड्यांची बरोबरी करता आली नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' आणि 'ॲनिमल' सारखे काही चित्रपट लवकरच थिएटरमध्ये पुन्हा प्रदर्शित होऊ शकतात.
Powered By Sangraha 9.0