रजनीकांत, अमिताभ बच्चन ३२ वर्षांनी एकत्र

    दिनांक :04-May-2024
Total Views |
मुंबई,
Rajinikanth-Amitabh Bachchan : दक्षिण चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार रजनीकांत आणि हिंदी चित्रपटांचे महानायक अमिताभ बच्चन शुक्रवारी एकमेकांना भेटले ते एका चित्रपटाच्या निमित्ताने. ही भेट ‘वेट्टैय' चित्रपटाच्या सेटवर झाली. या चित्रपटाचे चित्रीकरण सध्या मुंबईत सुरू आहे.
 
 
AMITABH
 
 
अमिताभ यांनी त्यांच्या ब्लॉगवर या भेटीची काही छायाचित्रे शेअर केली आहेत; ज्यात सुपरस्टार आणि महानायक सूट घातलेले दिसत आहेत. अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉगवर लिहिले की, ‘‘पुन्हा पहाटेचे शूट आहे. सी लिंक मार्गे मरिन ड्राईव्हला फक्त २० मिनिटांत पोहोचलो. ड्राईव्ह खूप सुंदर होती, पण त्याहूनही जास्त आनंद कामावर महान रजनीकांतचा सहवास होता. त्यांच्यात किंचतही बदल झालेला नाही. तोच नम्र, साधा आणि डाऊन टू अर्थ डायनॅमिक स्टार...'' हा चित्रपट यावर्षी ऑक्टोबरमध्ये प्रदर्शित होणार आहे. दिग्दर्शक टी. जे. ज्ञानवेल या चित्रपटाचे दिग्दर्शन करीत आहेत. मुख्य अभिनेता म्हणून रजनीकांत यांच्या कारकीर्दीतील हा १७० वा चित्रपट आहे.