स्वरसाधनाचा स्वरगंधित वसंत बहार

04 May 2024 16:25:18
नागपूर,
Swarasadhana . वसंत देसाई,  वसंत प्रभु, वसंत पवार, या दिग्गज संगीतकार त्रयींनी स्वरबद्ध केलेली गाणी सादर करून स्वरसाधनाने त्यांना स्वरसुमनांजली अर्पण केली. ही अभिनव संकल्पना असलेला मराठी भावगीतांचा दर्जेदार कार्यक्रम, स्वरसाधनाच्या 'वसंत बहार' कार्यक्रमाने महाराष्ट्र दिनाची पूर्वसंध्या स्वरगंधित झाली.हा कार्यक्रम मंगळवार दिनांक ३० ला  सायंकाळी ७ वाजता सायंटीफिक सभागृह, लक्ष्मीनगर येथे संपन्न झाला.घनश्याम सुंदरा ' ( आशिष घाटे ,स्वरदा देशपांडे )या भुपाळीने कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. 'जय गंगे भागीरथी ' , ' एक वार पंखावरूनी , ' नारायणा रमा रमणा ' ही गीते स्वरसाधना अध्यक्ष व जेष्ठ गायक श्याम देशपांडे यांनी कसदारपणे गात कार्यक्रम एका उंचीवर नेला. सुचित्रा कातरकर ( प्रेमा ,काय देऊ तुला, जिथे सागरा धरणी मिळते , कळा या लागल्या जीवा ), विजय देशपांडे ( जे वेड मजला लागले ,तुझ्या गळा माझ्या गळा ) ,अश्विनी लुले (हृदयी जागा तू अनुरागा , चाफा बोलेना ) , पद्मजा सिन्हा ( मधुमागसी माझ्या सख्या ) ,आशिष घाटे (मानसीचा चित्रकार तो) ,आकांक्षा चारभाई (मी मनात हसता प्रीत हसे , जन पळभर म्हणतील ) ,स्वरदा देशपांडे (ऋणानुबंधाच्या ,रघुपती राघव ) या गायकांनीआपआपली गीते ताकदीने गाऊन कार्यक्रमाचा दर्जा कायम राखला. 'जय जय महाराष्ट्र देशा ' या महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाचा समारोप झाला.

swar 
 
 गायक कलाकारांना आनंद मास्टे ( सिंथेसायझर) मोरेश्वर दहासहस्त्र , रवी सातफळे (तबला ) गजानन रानडे या वादक कलाकारांनी समर्पक साथसंगत करत रंगत वाढवली.किशोर गलांडे यांच्या माहितीपूर्ण निवेदनाने कार्यक्रम अधिक रंजक झाला.Swarasadhana तरंगफौंडेशनच्या सदस्य प्रा .डॉ. जयश्री फुके व विधिज्ञ  प्रवीण राजवैद्य यांची प्रमुख उपस्थिती होती. जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते  शंकर जाधव यांचे सौजन्य या कार्यक्रमास लाभले होते. पुर्वार्धाचे सूत्रसंचालन अभिजित बोरीकर यांनी केले होते.
सौजन्य:  वर्षा किडे /कुलकर्णी ,संपर्क मित्र  
Powered By Sangraha 9.0