अक्षय राहाव्यात सत्प्रवृत्ती

Akshaytririya-Nagpur सर्वे सन्तु निरामयाः ।

    दिनांक :05-May-2024
Total Views |
अक्षय्य तृतीया विशेष
- डॉ. विजया वाड
Akshaytririya-Nagpur आपल्याकडे साडेतीन मुहूर्त अत्यंत शुभ मानले जातात. ‘अक्षय्य तृतीया' हा त्यापैकी एक. या दिवशी कोणतेही चांगले काम करण्याचा प्रारंभ करावा, असे म्हटले जाते. असे विशेष महत्त्व असल्यामुळेच या दिवशी लग्न, मुंज वा खास पूजा केल्या जातात. थोडक्यात, या दिवशी एखादे चांगले कृत्य घडावे अशी आपली इच्छा असते. Akshaytririya-Nagpur अक्षय म्हणजे ज्याला क्षय नाही असा... या अर्थाने अक्षय सुख मिळावे अशी प्रत्येकाची इच्छा असते. कोणालाच दु:ख नको असते. म्हणूनच अक्षय सुखाची कामना करत हा दिवस साजरा होतो. Akshaytririya-Nagpur मात्र, स्वत:साठीच नव्हे तर प्रत्येकासाठी ही कामना करावी, असे म्हणावेसे वाटते. हा केवळ आपल्यापुरते पाहण्याचा काळ नाही, याची जाणीव प्रत्येकाने ठेवायला हवी.
 
 

Akshaytririya-Nagpur 
 
 
सर्वांसी सुख लाभावे, जशी आरोग्यसंपदा Akshaytririya-Nagpur
कल्याण व्हावे सर्वांचे, कोणी दु:खी असू नये
असे आपल्याला शाळेत शिकवले गेले आहे. डबा खाण्यापूर्वी सर्वांनी एकत्र म्हणायची ही प्रार्थना होती. आमच्याच नव्हे, तर सगळ्यांनीच ही वा या अर्थाची प्रार्थना म्हटली असेल.
सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः ।
सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चिद्दुःखभाग्भवेत् ।Akshaytririya-Nagpur
असेही आपण म्हणतो. ज्ञानेश्वरांनीही ‘सुखिया झाला...' असे म्हटले आहे. अशा प्रकारे सर्व चांगल्या गोष्टी अक्षय राहण्याची कामना करणारी अक्षय्य तृतीया आहे. तिचे महत्त्व जाणून या दिवशी सगळ्यांनीच चांगली कामे करण्याचा संकल्प करणे गरजेचे आहे. समाजहिताची, समाजस्वास्थ्याची, समाजकल्याणाची कामे करणे ही आजची सगळ्यात मोठी गरज आहे.Akshaytririya-Nagpur
 
 
 
आजही जातिभेद नष्ट होण्याचा विषय ऐरणीवर येणे गरजेचे आहे. त्यासाठी सगळ्यांनी एकत्र येत प्रयत्न करू या. हा कनिष्ठ, तो उच्च हा भेद आता तरी संपायला हवा. नाही म्हणायला आता तो कमी होतो आहे. पूर्वीपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर वा त्यांच्यासारख्या समाजसुधारकांनी त्यासाठी अथक प्रयत्न केले. Akshaytririya-Nagpur पण हा भेद अद्याप समूळ नष्ट झालेला नाही, ही खंत आहे. गावागावांमध्ये अजूनही जातिभेदाला प्रोत्साहन देणाऱ्या, भेदाभेदाची मुळे जपणाऱ्या घटना वा कृती आपण पाहतो. एखाद्याला वरून पाणी देणे, तांब्याला स्पर्श न करू देणे असे प्रकार पाहायला मिळतात. ते नक्कीच खुपणारे आहे. त्यामुळे यंदाची अक्षय्य तृतीया साजरी करताना हा भेदाभेद नष्ट करण्याच्या चांगल्या कामाला आपल्या सोसायटीपासूनच सुरुवात करायला हवी.
 
 
सोसायटीतील सदस्यांनी कथित खालच्या व्यक्तीला पाणी दिले, आपण घरी खातो ते खायला दिले, घरात प्रवेश दिला तर बघता बघता भेदाच्या भिंती गळून पडतील. Akshaytririya-Nagpur माझ्याबद्दल बोलायचे तर, सोसायटीतील गुरख्याला आमच्याकडे मुक्त प्रवेश असतो. सुरुवातीला त्याला विशेष वाटायचे. मात्र, मला वा मुलींना हे खूप स्वाभाविक वाटायचे. या संस्कारातच मी मुलींना तसेच विद्याथ्र्यांना घडवले. त्यामुळेच मुलींच्याही घरात आता कोणतेही भेदभाव पाळले जात नाहीत. सध्या विविधांगाने दु:ख आयुष्यात प्रवेश करतात. ती टाळण्यासाठी आधी आदर्श समाज घडणे गरजेचे आहे. ते साधण्यासाठी बरेच उपाय योजता येतील. उदाहरणार्थ एक सुस्थापित, आपल्या गरजा व्यवस्थित भागवू शकणारे कुटुंब एखादे गरीब कुटुंब नक्कीच दत्तक घेऊ शकते. माझ्या मते, ही सध्याच्या भारतातील सर्वोत्तम परिस्थिती होईल.Akshaytririya-Nagpur
 
 
सधन कुटुंबाने एखाद्या गरजू कुटुंबाचा भार घेतला तर बघता बघता अनेक प्रश्न निकामी निघतील. शेवटी दातृत्व सगळ्यांमध्ये नसते. खरे तर अनेकांची आपल्यापुरते बघण्याचीच वृत्ती असते. मात्र, ती सोडली वा कधी तरी ती सोडण्याची सक्ती केली तर समाज निश्चितच एका वेगळ्या वळणावरून प्रवास करू लागेल. पूर्वी अनेक घरांनी असे आदर्श घालून दिले आहेत. काळाच्या पुढे चालणारी वा स्वत:आधी समाजाचा विचार करणारी अशी अनेक घरे मी पाहिली आहेत. Akshaytririya-Nagpur कित्येक घरांमध्ये आधी घरात काम करणाऱ्या सेवकवर्गाला आधी पोशाख केला जात असे आणि त्यानंतर घरातील मुलांसाठी खरेदी होत असे. या संस्कारांमधून समोर आलेले लोक आजही हे संस्कार निगुतीने जपतात. कारण ते चिरंजीवी असतात. आपल्या आईवडिलांना असे वागताना पाहणारी मुले पुढील आयुष्यात त्याच संस्कार आणि शिकवणीची धुरा वाहतात. म्हणूनच आजच्या पालकांनी मुलांवर असेच संस्कार करणे गरजेचे आहे.
 
 
 
Akshaytririya-Nagpur एकीकडे सद्भावना अक्षय्य राहायला हव्यात तर दुसरीकडे गुलामगिरीच्या मानसिकतेचा क्षय व्हायला हवा. बायकांकडे बघण्याच्या वाईट दृष्टीचा क्षय व्हायला हवा. सगळी संपत्ती आपल्याकडेच हवी, या मतलबी वृत्तीचा क्षय व्हायला हवा. एखाद्याकडे वाटण्याची क्षमता नसली तर ती येनकेनप्रकारेण आणायला हवी, असे वाटते. एकीकडे हा संपूर्ण उत्सव सामाजिक अंगाने महत्त्वाचा असतो तर दुसरीकडे उन्हाळा सुसह्य करण्यासाठी तसंच निसर्ग संवर्धनासाठीही महत्त्वपूर्ण असा असतो. पाणवठे हे सृष्टीमधील प्राणकेंद्र आहेत. पाण्याशिवाय जीवन शक्य नाही, सजीवांचं अस्तित्व शक्य नाही. म्हणूनच या दिवशी कुंभामध्ये जल घालून त्याची पूजा करतात आणि हे पाणी सगळ्यांनी प्यायचं आहे, अशी सामुदायिक भावना निर्माण करतात. Akshaytririya-Nagpur याचा सरळ अर्थ म्हणजे पाण्यावर आधी सृष्टीतील सर्व प्राण्यांचा हक्क असून त्यानंतर माणसाचा हक्क आहे. आपण नेहमी वाचतो अथवा पाहतो की, जंगलातले प्राणी मानवी वसाहतींकडे येऊ पाहात आहेत. कारण पाणवठे उजाड झाले आहेत. असे असताना प्राण्यांची तहान कशी भागणार, हा साधा प्रश्न आहे. आजही गावागावांत अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सामुदायिक पाणपोया घातल्या जातात.
 
 
 
पहिला पाऊस पडेपर्यंत पाणपोया सुरू ठेवायच्या असतात. सगळ्या लोकांना पाणी मिळायला हवे. यात्रेकरू, वाटसरूंना पाणी मिळावे ही त्यामागील भावना असते. ठरावीक लोक पाणी पुरवण्याची जबाबदारी घेतात. पाण्याच्या स्वच्छतेची काळजी घेतली जाते. कारण पाणी हे जीवन आहे तसेच तो सृष्टीमध्ये नवरस निर्माण करणारा घटक आहे. म्हणूनच शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्याची दक्षता घेतली गेली तर आरोग्याचा प्रश्न सुटेल. Akshaytririya-Nagpur पर्यावरण संतुलन साधले जाईल. लोकांना पाण्याची किंमत कळेल. अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने हाती घेतले जाणारे असे सगळे उपक्रम उपयुक्त ठरतील. पाण्याबरोबरच सृष्टीची पूजा करताना आंबा या फळाचा नैवेद्य दाखवण्याची प्रथा आहे. आंब्याला ‘अमृतवृक्ष' म्हणतात. हे केवळ रसापुरते फळ नाही तर तो तपश्चर्येचा वृक्ष आहे. ज्ञानाच्या संवादाचा वृक्ष आहे. पूर्वीच्या गुरुकुलातल्या चर्चा याच आम्रवृक्षाखाली होत असत. आजही मंगल कार्यात आंब्याच्या डहाळीचे प्रथम पूजन होते. Akshaytririya-Nagpur आंब्याचे तोरण बांधल्याशिवाय मंगल कार्य पुढे जात नाही.
 
 
 
या साऱ्या गोष्टीचा अर्थ एकच. आपण ज्या झाडाची फळे खातो ते आपण हयातीत लावलेच पाहिजे. पूर्वी गुरुकुलात हा नियमच होता. झाड लावल्याशिवाय तुम्हाला फळ खायचा अधिकार नाही, असे मानले जात असे. ही भावना आपल्या जगण्यातही महत्त्वाची आहे. या दिवशीचा नैवेद्य सामुदायिक असतो. तो प्रसाद म्हणून सगळ्यांना द्यायचा असतो. Akshaytririya-Nagpur सृष्टीच्या पूजेला सगळ्यांना बोलवायचे असते. या सगळ्या प्रथा-परंपरांमधून आपण व्यापक होण्याचा संदेश मिळतो. संकुचितपणा नाहीसा करणे आणि व्यापक मनाने वर्तमानाला सामोरं जाणं म्हणजे अक्षय्य तृतीया होय. थोडक्यात, नकारात्मक गोष्टींचा त्याग करून सगळ्यांना उदात्त प्रेरणेने घेऊन पुढे जाणे म्हणजे ही तृतीया साजरी करणे. ‘मी माझ्यापुरते' न पाहता हा ‘मी' ‘आम्ही' कसा होईल, याचा विचार या दिवशी करायचा असतो. अक्षय्य तृतीया हा चैत्र गौरीच्या हळदी-कुंकूवाच्या समाप्तीचा दिवस असतो. चैत्र शुद्ध तृतीया ते वैशाख शुद्ध तृतीया या काळात चैत्रगौरीचे हळदी-कुंकू केले जाते.
 
 
 
Akshaytririya-Nagpur यालाही एक विशिष्ट सामाजिक हेतू आहे. सर्व थरातल्या स्त्रियांनी एकत्र यावे, विचारांची देवाणघेवाण व्हावी, स्त्रियांना ज्ञानसंपन्न करावे यासाठी गौरीचे पूजन करतात. गौरी म्हणजे पार्वती आणि गौरी म्हणजेच लक्ष्मी. पार्वतीमध्ये तप आहे तर लक्ष्मीमध्ये ऐश्वर्य आहे. या दोन मूल्यांशिवाय माणसाचे व्यक्तिमत्त्व समृद्ध होत नाही, हेच यातून सुचवायचे आहे. अक्षय्य तृतीयेच्या सणाच्या निमित्ताने मानवी जीवनाचा प्रवास तपातून झाला पाहिजे आणि त्या तपाला ऐश्वर्याची फळे लागली पाहिजेत, हा विचार दिसतो. म्हणूनच या मुहूर्तावर सोने खरेदी करतात. या मुहूर्तावर सोने खरेदी शुभ समजली जाते. Akshaytririya-Nagpur अर्थात सोने खरेदी करणे म्हणजे प्रत्यक्ष दुकानात जाऊन सोने खरेदी करणे असा अर्थ नाही तर कष्टातून आपले ऐश्वर्य वाढवण्यालाही जीवनाचे सोने करणे म्हणतात. आपल्याला साध्य करायचे आहे ते मनापासून करत, सतत सकारात्मक वृत्तीने पुढे जाणे हा अक्षय्य तृतीयेचा खरा ठेवा आहे. ही भावना जाणून घेतली तरच आपल्याला या सणाचे महत्त्व सहज लक्षात येईल.