अयोध्या शुभ, तेच होणार पंतप्रधान : इकबाल अंसारी

Ayodhya-Iqbal Ansari-Modi अयोध्या प्रकरणातील माजी पक्षकार

    दिनांक :05-May-2024
Total Views |
अयोध्या,
 
 
Ayodhya-Iqbal Ansari-Modi श्रीराम मंदीराचं भूमीपूजन आणि श्रीरामललाची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर आज तिसèयांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी श्रीरामजन्मभूमीत दाखल होणार आहेत. श्रीरामललाची महापूजा केल्यानंतर ते अयोध्येत रोड शो करणार आहेत. ‘त्यांच्या आगमनाने आम्ही आनंदीत आहोत. Ayodhya-Iqbal Ansari-Modi ते पुन्हा पंतप्रधान व्हावेत, हीच आमची शुभेच्छा आहे. अयोध्या त्यांच्यासाठी शुभ आहे. आम्ही फुलं उधळून त्यांचं स्वागत करणार आहोत,' अशी प्रतिक्रीया श्रीरामजन्मभूमी विवाद प्रकरणातील माजी पक्षकार इकबाल अंसारी यांनी व्यक्त केली आहे. Ayodhya-Iqbal Ansari-Modi श्रीरामललाच्या दर्शनाला आलेल्या यात्रेकरूंनी आपला अयोध्येतील मुक्काम वाढवला असून ते मोदींच्या रोड शोसाठी उपस्थित राहणार आहेत. 
 
 
 
Ayodhya-Iqbal Ansari-Modi
 
 
Ayodhya-Iqbal Ansari-Modi पंतप्रधानांच्या आगामी दौऱ्यासाठी अयोध्यानगरी सज्ज झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोड शोसाठी स्थानिकांमध्ये प्रचंड उत्साहाचं वातावरण बघायला मिळत असून सायंकाळी ७ वाजताच्या सुमारात पंतप्रधान अयोध्येत दाखल होतील. गेल्या दहा वर्षांपासून अयोध्येतून खासदार असलेले लल्लू सिंह यंदा विजयाची हॅटट्रीक करतात का? याकडे जनतेचं लक्ष लागून राहीलं आहे. राम जन्मभूमीचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी, नरेंद्र मोदी यांच्यावर श्रीराम ललाची कृपा कायम रहावी, अशा शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत. Ayodhya-Iqbal Ansari-Modi अयोध्येसह फैजाबादसह उत्तर प्रदेशातील १४ जागांसाठी येत्या २० मे रोजी पाचव्या टप्प्यात मतदान होणार आहे.