फाफ डू प्लेसिसचा सलग तिसऱ्या विजयानंतर मोठा खुलासा

    दिनांक :05-May-2024
Total Views |
मुंबई,   
Faf du Plessis रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने शनिवारी गुजरात टायटन्सवर विजय नोंदवल्यानंतर सांगितले की, त्यांचा संघ धावफलकाकडे लक्ष देण्याऐवजी आपल्या पद्धतीने खेळत आहे. आरसीबीने आईपीएल 2024 च्या 52 व्या सामन्यात गुजरातचा 38 चेंडू बाकी असताना चार विकेट्सने पराभव केला.  विराट कोहलीच्या डोक्यावर पुन्हा ऑरेंज कॅप सजली
 
 
Faf du Plessis
 
23 वर्षांनंतर यंदा अक्षय्य तृतीयेला विवाह नाही!  बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात गुजरात टायटन्सने प्रथम फलंदाजी केली आणि संपूर्ण संघ 19.3 षटकात 147 धावांवर सर्वबाद झाला. प्रत्युत्तरात आरसीबीने 13.4 षटकांत 6 गडी गमावून लक्ष्य गाठले. या विजयासह आरसीबीने प्ले ऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. त्याचवेळी गुजरातसाठी प्लेऑफचा मार्ग कठीण झाला आहे. दरम्यान, फाफ डू प्लेसिस म्हणाला की  गेल्या काही सामन्यांमध्ये आमची कामगिरी उत्कृष्ट होती. आम्ही बॉल आणि बॅट दोन्हीत चांगली कामगिरी केली. Faf du Plessis आम्ही बॅटने आक्रमकता दाखवली आणि क्षेत्ररक्षणात अप्रतिम कामगिरी केली. विकेटवर अधिक उसळी होती. आम्हाला याची जाणीव होती आणि गोलंदाजांनी चांगली कामगिरी करत राहिलो. आम्ही एक झेल सोडला, पण कामगिरी सातत्यपूर्ण होती. 180-190 चा स्कोअर चांगला झाला असता, पण सामना बदलल्याचे आम्ही पाहिले. स्कोअरबोर्डकडे न पाहता आम्हाला हवे तसे खेळायचे हा आमचा मंत्र होता. एकामागून एक विकेट पडत असल्याने थोडी चिंता वाढली. कदाचित आमची फलंदाजी मजबूत नसेल, पण आम्हाला सकारात्मक राहायचे आहे. आम्ही आमचा नेट रन रेट वाढवण्याचा विचार करत होतो.   सुनील गावसकर यांची विराटवर जोरदार टीका
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा 11 सामन्यांमधला हा चौथा विजय असून गुणतालिकेत त्यांनी दोन स्थानांनी झेप घेत सातव्या स्थानावर झेप घेतली आहे. त्याचबरोबर गुजरात टायटन्स संघ 8 गुणांसह 9व्या स्थानावर घसरला आहे. आरसीबीचा पुढील सामना गुरुवारी धर्मशाला येथे पंजाब किंग्जविरुद्ध होणार आहे.  अक्षय्य तृतीयेचा कुबेर देवाशी काय संबंध? घ्या जाणून