-अकोलेकरांसाठी आणखी एक गाडी
अकोला,
INDIAN EXPRESS दक्षिण मध्य रेल्वेने काचीगुडा-हिसार-काचीगुडा साप्ताहिक विशेष एक्सप्रेस चालविण्याचा निर्णय घेतला आहे.2 मे ते 30 जून या कालावधीत या एक्सप्रेसच्या अप व डाऊन प्रत्येकी नऊ अशा एकूण 18 फेर्या होणार असून, दोन्ही बाजुंनी अकोला स्थानकावर थांबा देण्यात आल्याने अकोलेकर प्रवाशांची सोय होणार आहे. उन्हाळी सुट्यांमध्ये प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे.
पाकला करायची आहे नुपूर शर्माची हत्या
INDIAN EXPRESS प्राप्त माहितीनुसार, गाडी क्र. 07055 काचीगुडा-हिसार विशेष एक्सप्रेस 2 मे ते 27 जून या कालावधीत दर गुरुवारी प्रस्थान स्थानकावरून 15:15 वाजता रवाना होऊन तिसर्या दिवशी हिसार येथे 11:15 वाजता पोहोचणार आहे. ही गाडी दर शुक्रवारी 3:25 वाजता अकोला स्थानकावर येणार आहे. परतीच्या प्रवासात गाडी क्र. 07056 हिसार-काचीगुडा विशेष एक्सप्रेस 5 मे ते 30 जून या कालावधीत दर रविवारी प्रस्थान स्थानकावरून 12:35 वाजता रवाना होऊन तिसर्या दिवशी मंगळवारी 07:30 वाजता काचीगुडा येथे पोहोचणार आहे. ही गाडी दर सोमवारी 20:00 वाजता अकोला स्थानकावर येणार आहे.