शिवसेना प्रमुखांची छबी खराब कराल तर...

    दिनांक :05-May-2024
Total Views |
गोंदिया, 
loksabha 2024 maharashtra शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची व्हीडिओ क्लिप एडिटिंग करून त्यांच्या छबीला खराब करण्याचे काम अज्ञात व्यक्तीकडून करण्यात येत आहे. त्या अज्ञात व्यक्तीवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेच्या (उठाबा) पदाधिकार्‍यांनी निवेदनातून पोलिसांना केली आहे.
 
 

rere 
loksabha 2024 maharashtra निवेदनानुसार, शिवसेना (उठाबा) गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची व्हीडिओ क्लिपमध्ये एडिटिंग करुन त्यांच्याबद्दल आक्षेपार्ह चित्रण करण्यात आले आहे. समाजात उद्धव ठाकरे छबी खराब होण्याचे काम अज्ञात व्यक्तीकडून होत आहे. या प्रकाराबद्दल शिवसैनिकांमध्ये रोष आहे. त्यामुळे अज्ञात व्यक्तीचा शोध घेऊन कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शहर अध्यक्ष राजेशजी कनोजिया, जिल्हा समन्वयक सुनिल लांजेवार, उपजिल्हा प्रमुख तेजराम मोरघडे, उपजिल्हा संघटक अशोक आरखेल, युवासेना जिल्हाध्यक्ष हरिश तुळसकर, तालुका सम्यांवयक संजू समशेरे, अल्पसंख्यक उपाध्यक्ष शहारुख पठाण, कार्यालय सचिव माही बंजारे आदींनी निवेदनातून केली आहे.