महत्त्वाची तिसरी फेरी !

Election 2024-India ध्रुवीकरणाचे राजकारण

    दिनांक :06-May-2024
Total Views |
दिल्ली दिनांक 
 
 
- रवींद्र दाणी
Election 2024-India निवडणूक आयोगाने पहिल्या दोन फेèयातील मतदानाची सुधारित टक्केवारी जाहीर केली. पहिल्या फेरीत ६६.१४ तर दुसऱ्या  फेरीत ६६.७१ टक्के मतदान झाल्याचे आयोगाने म्हटले आहे. नवी आकडेवारी पाहत २०१९ च्या तुलनेत मतदानात फार घट झालेली नाही. Election 2024-India या मतदानाचे दोन अर्थ लावले जाऊ शकतात. एक म्हणजे मतदारांनी कुणाच्या बाजूने मतदान केलेले नाही आणि दुसरा अर्थ म्हणजे मतदार सरकारच्या विरोधात नाही. १९७७ मध्ये आणिबाणीच्या विरोधात लाट होती. त्याचा परिणाम म्हणजे ६१ टक्के मतदान झाले होते. Election 2024-India १९८४ मध्ये इंदिरा गांधींच्या हत्येमुळे काँग्रेससाठी सहानुभूतीची लाट होती. त्याचा परिणाम म्हणजे ६४ टक्के मतदान झाले होते. यावेळी सकारात्मक वा नकारात्मक लाट असती तर मतदान जास्त झाले असते. ते झाले नाही याचा अर्थ सत्ताधारी पक्षाला फार चिंता करण्याचे कारण नाही.Election 2024-India
 
 
 
Election 2024-India
 
 
Election 2024-India पहिल्या दोन फेऱ्या : पहिल्या दोन फेऱ्यात केरळ व तामिळनाडू ही दोन राज्ये होती. या दोन्ही राज्यात सत्ताधारी भाजपाला २०१९ मध्ये फारसे यश मिळालेले नाही. या दोन राज्यांत लोकसभेच्या ६० जागा आहेत. म्हणजे पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये जे मतदान झाले आहे, त्याच्या एक तृतीयांश जागा या दोन राज्यांत आहेत. या राज्यांमध्ये यावेळी भाजपाला काही जागा मिळण्याची शक्यता असली, तरी तो पक्षासाठी बोनस मानला जाईल. कारण ही राज्ये कधीही भाजपासाठी चांगली राज्ये मानली जात नव्हती.
ध्रुवीकरणाचे राजकारण : Election 2024-India केरळ व तामिळनाडूतील राजकारण ध्रुवीकरणाचे राजकारण राहात आले आहे. केरळमध्ये डावी आघाडी व काँग्रेस आघाडी तर तामिळनाडूत द्रमुक व अण्णा द्रमुक असे राजकारण चालत आले आहे. भाजपा यावेळी या राज्यांमध्ये एखादा राजकीय चमत्कार घडवील काय, असा एक प्रश्न विचारला जात आहे. भाजपा यासाठी आशावादी असला, तरी या प्रश्नाचे नेमके उत्तर मिळण्यासाठी ४ जूनची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
 
 
 
Election 2024-India तिसरी फेरी : तिसऱ्या फेरीत ९४ जागांवर मतदान होत असून ही फेरी पूर्ण झाल्यावर लोकसभेची निम्मी निवडणूक आटोपलेली असेल. तिसऱ्या फेरीत मतदान होत असलेले ९४ मतदारसंघ १२ राज्यांमध्ये पसरलेले आहेत. या फेरीचे भाजपासाठी असणारे महत्त्व म्हणजे गुजरातमधील २६ पैकी २५ मतदारसंघांत या फेरीत मतदान होणार आहे. सुरतची जागा भाजपाने याआधीच अविरोध जिंकली आहे. २०१४, २०१९ या दोन्ही निवडणुकीत राज्यातील सर्व २६ पैकी २६ जागा जिंकल्यानंतर भाजपाला यावेळी विजयाची हॅट्ट्रिक करावयाची आहे. भाजपासाठी तिसरी फेरी महत्त्वाची असल्याचे जे मानले जाते ते यामुळेच!
मध्यप्रदेश : मध्यप्रदेशातील भिंड, भोपाळ, गुना, ग्वाल्हेर, मोरेना, रायगढ, सागर, विदिशा या ८ मतदारसंघांत या फेरीत मतदान होत असून २०१९ मध्ये यातील बहुतेक जागा भाजपाने जिंकलेल्या आहेत. Election 2024-India काँग्रेस सोडून भाजपात आलेले ज्योतिरादित्य शिंदे  यांचे प्रभाव क्षेत्र असलेल्या ग्वाल्हेरमध्ये या फेरीत मतदान होत आहे. माजी मुख्यमंत्री शिवराजqसह चौहान विदिशातून निवडणूक लढवित आहेत. त्या सर्व जागा कायम ठेवणे भाजपासाठी महत्त्वाचे ठरणारे आहे.
 
 
Election 2024-India कर्नाटक : दक्षिणेत भाजपाला चांगले यश देणारे राज्य म्हणून कर्नाटकाचा उल्लेख केला जातो. कर्नाटकातील १४ मतदारसंघांत मतदान आटोपले असून उर्वरित १४ मतदारसंघांत उद्या तिसèया फेरीत मतदान होईल. २०१९ मध्ये भाजपाने राज्यातील २८ पैकी २५ जागा जिंकल्या होत्या. काँग्रेस, जनता दल सेक्युलर व अपक्ष यांना प्रत्येकी एक जागा मिळाली होती. वर्षभरापूर्वी राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला मोठा धक्का बसला होता. त्या साऱ्या पृष्ठभूमीवर २०१९ च्या कामगिरीची पुनरावृत्ती करणे भाजपासाठी एक आव्हान ठरणार आहे. Election 2024-India राज्यात भाजपाच्या काही जागा कमी होतील, असे मानले जाते. जागांमध्ये होणारी ही घट कमीत कमी राहावी, असा भाजपाचा प्रयत्न राहणार आहे. पण, तरी किती जागा घटतील, याचा अंदाज बांधता आलेला नाही. काँगे्रस नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी २८ पैकी १८ जागा जिंकण्याचा अंदाज वर्तविला आहे. या निवडणुकीसाठी राज्यात तयार झालेले नवे राजकीय समीकरण म्हणजे जनता दल सेक्युलरशी भाजपाने केलेली युती.
 
 
 
कर्नाटकाच्या राजकारणात लिंगायत व वोक्कालिंग हे दोन प्रभावी समाज मानले जातात. यात लिंगायत समाज भाजपाकडे तर वोक्कालिंगांचा पाठींबा देवेगौडांना अशी एक परंपरा स्थापित झालेली आहे. Election 2024-India ही युती भाजपासाठी एक जमेची बाजू राहणार आहे. मात्र, तरीही २०१९ च्या कामगिरीची पुनरावृत्ती करणे भाजपासाठी एक आव्हान ठरणार असून, ते आव्हान पक्ष कशाप्रकारे हाताळतो, यावर या राज्यात भाजपाची कामगिरी अवलंबून राहणार आहे.
Election 2024-India महाराष्ट्र : राज्यातील लोकसभा मतदारसंघांची संख्या विचारात घेता उत्तरप्रदेशानंतर महत्त्वाचे मानल्या जाणाऱ्या महाराष्ट्रातील ११ मतदारसंघांत उद्या मतदान होत आहे. यात प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या बारामती मतदारसंघाचा समावेश आहे.
उत्तरप्रदेश : उत्तरप्रदेशातील संभल, हाथरस, बरेली, आग्रा, फतेहपूर सिक्री, फिरोजाबाद, मैनपुरी, एटा, बदाऊं, आंवला या १० मतदारसंघांत या तिसऱ्या फेरीत मतदान होत आहे. उत्तरप्रदेशातील प्रत्येक फेरी भाजपासाठी महत्त्वाची ठरणार आहे. Election 2024-India २०१४ च्या तुलनेत २०१९ च्या निवडणुकीत भाजपाच्या काही जागा कमी झाल्या आहेत. भाजपाला २०१४ च्या कामगिरीची बरोबरी करावयाची असल्यास प्रत्येक फेरीत एखाद-दुसरी जागा वगळता अन्य सर्व जागा जिंकणे पक्षासाठी आवश्यक ठरणार आहे. Election 2024-Indiaराज्यातील सुधारलेली कायदा सुव्यवस्था ही भाजपासाठी एक जमेची बाजू राहणार असल्याचे पक्षाला वाटते.
 
 
 
Election 2024-India सपा-काँग्रेस युती : राज्यात सपा व काँग्रेस याची युती झाली असली, तरी काही मतदारसंघ वगळता या युतीचा फार काही परिणाम होण्याची चिन्हे नाहीत. सपा नेते अखिलेश यादव यांनी कनौज मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. येथील यादव-मुस्लिम समीकरण विचारात घेता ते निवडून येतीलही. काही मतदारसंघांत या युतीचा प्रभाव दिसेल. मात्र, सपा-काँग्रेस युती राज्यात चमत्कार करील, अशी शक्यता नाही. यात मायावतींची बसपा सामील झाली असती तरी काही मतदारसंघांत भाजपासाठी समस्या निर्माण झाली असती. पण, मायावतींनी स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. बसपाला दलित मते मिळतील. पण, केवळ दलित मतांच्या शिदोरीवर बसपाला निवडणूक जिंकता येणार नाही. २०१९ च्या निवडणुकीत राज्यात बसपा दुसऱ्या क्रमांकावर होती. यावेळी बसपाची स्थिती आणखी घसरण्याची चिन्हे आहेत.
 
 
Election 2024-India पहिली निवडणूक : देशातील काही भागांत मतदानाची टक्केवारी घसरली असली, तरी अन्य काही भागांत ७०-७५ टक्के मतदान होत आहे, ही बाब भारतीय लोकशाहीसाठी अतिशय समाधानकारक आहे. हिंसाचारग्रस्त मणिपूरमध्येही ७० टक्क्यांहून अधिक मतदान झाले आहे. ब्रिटिशांशी लढून देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर झालेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत फक्त ४४ टक्के मतदान झाले होते, हे विशेष. तर, १९५७ मध्ये झालेल्या दुसऱ्या लोकसभा निवडणुकीत मतदानाचे प्रमाण एक टक्का वाढून ते ४५ टक्के झाले. Election 2024-India नंतर हळूहळू मतदानाची टक्केवारी वाढू लागली. लोकशाहीची जननी मानल्या जाणाऱ्या ब्रिटन-अमेरिकेतही ६०-६५ टक्के मतदान होत आले आहे. त्यामुळे भारतात होत असलेले मतदान कमी नाही. पण, योग्य हवामानात मतदान झाले तर मतदानाचे प्रमाण ७० टक्क्यापर्यंत जाऊ शकते. अर्थात हे सारे निवडणूक आयोगाच्या सुबुद्धीवर अवलंबून आहे. Election 2024-India