गडचिरोलीतील खेळाडू राष्ट्रीय पातळीवर चमकला पाहिजे : चिमटे

Gadchiroli-Cricket-VCA विदर्भस्तरीय प्रशिक्षणाचे उदघाटन

    दिनांक :06-May-2024
Total Views |
गडचिरोली, 
 
 
Gadchiroli-Cricket-VCA विदर्भ क्रिकेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने 19 वर्षाखालील मुलांचे विदर्भस्तरीय क्रिकेट प्रशिक्षणाला गडचिरोली येथे आज 6 मे रोजी सुरुवात झाली आहे. योग्य प्रशिक्षण व मार्गदर्शनाअभावी आदिवासीबहूल गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामीण भागात अनेक खेळाडू दडले आहे. Gadchiroli-Cricket-VCA त्यासाठी या विदर्भस्तीय प्रशिक्षणाचे येथे आयोजन करण्यात आले असून येणार्‍या काळात येथील खेळाडू राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकरणार असा विश्‍वास विदर्भ क्रिकेट असोसिएशनचे सतीश चिमटे यानी आज आयोजित पत्रपरिषदेतून व्यक्त केला आहे.Gadchiroli-Cricket-VCA
 
 
 
Gadchiroli-Cricket-VCA
 
 
 
सदर प्रशिक्षण 6 मे ते 5 जूनपर्यंत चालणार आहे. हे क्रिकेट प्रशिक्षण शिबिर विदर्भ क्रिकेट असोसिएशनचे सतीश चिमटे, नंदू गोरे तसेच मुख्य प्रशिक्षक म्हणून राहुल चिखलकर यांच्या मार्गदर्शनात सुरु आहे. त्यासाठी प्रशांत भोपाल आणि मेहमूद खान हे त्यांना सहकार्य करीत आहेत. Gadchiroli-Cricket-VCA अशा प्रशिक्षणातून शहर व ग्रामीण भागातील खेळाडूंना याचे महत्व समजून पूढे जाऊन ते उत्कृष्ट क्रिकेटवीर तयार होतील, असा या प्रशिक्षणामागचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगीतले. या प्रशिक्षणात कमी-कमी नो बॉल कसा जाईल, बॅट कशी पकडायची, फलंदाजी, गोलंदाजी कशी करायची, बॉल कसा पकडायचा आदींबाबत माहिती देण्यात येणार आहे. Gadchiroli-Cricket-VCA गडचिरोली जिल्ह्यामध्ये हा उपक्रम प्रथमच राबवल्या जात असून या प्रशिक्षणाची जिल्ह्यातील खेळाडूंना नक्किच लाभ होईल. या ठिकाणी क्रिकेटसाठी सर्व सोयीयुक्त मोठे मैदान तयार होण्याची गरज आहे. त्यामुळे खेळाडूंचा आणखी उत्साह वाढेल असेही चिमटे म्हणाले. शिबिर यशस्वीतेसाठी आशिष बावनकुळे सचिन मडावी सहकार्य करीत आहे.