नागपूर,
ICSE Results : दी कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशनने (सीआयएससीई) आयसीएसई म्हणजे दहावी व बारावीचा निकाल सोमवारी घोषित झाला. यात नागपूर शहराचा निकाल १०० टक्के लागला. बारावीमध्ये चंदादेवी सराफ शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयातील २८ विद्याथ्र्यांपैकी आदित साहू याने ९०.२५ टक्के गुण मिळवले. तर रुद्र राजकने ८१.७५ टक्के गुण मिळविले.

मागील दोन वर्षाच्या तुलनेत यावर्षी दोन्ही वर्गाच्या विद्याथ्र्यांच्या गुणांच्या टक्केवारीत घट झाली आहे. नागपुरातील तीन शाळेत आयसीएसई व एका शाळेत आयएससी अभ्यासक्रम शिकविला जातो. मेरी पॉसेपिन अकादमीमधील दहावीच्या १३१ विद्याथ्र्यांपैकी १६ विद्याथ्र्यांना ९० टक्केहून अधिक गुण मिळाले. त्यात तृषा वासनिक ९५.२ टक्के, शंतनू वानखेडे ९४.६ टक्के, शार्दुल मेश्राम ९४.८ टक्के, श्रेयश श्रीवास ९३.८ टक्के, संपदा आहके ९३.४ टक्के, मो. आरीम खान ९२.६ टक्के, आनिया शेख ९१.८ टक्के, सनाया टेंभुर्णीकर ९१.६ टक्के, वेद मेश्राम ९१.६ टक्के, हर्ष सोनेकर ९१.४ टक्के, अर्णव गजभिये ९१.२ टक्के, भगवान शंकर ९१.२ टक्के यांचा समावेश आहे. याशिवाय चंदादेवी सराफ शाळेतून मृदुल बोडेने ८१टक्के, वान्या गुप्ता ८०टक्के गुण मिळविले. तर दहावीमध्ये राज गणेश मिश्रा ९९.२०टक्के, अनन्या शोरे ९७.८०टक्के, विभुसा नीलमेगम ९६.२० टक्के , सोहम मोहित मेहताने ९६.२०टक्के, श्रीरंग महेश वैद्य ९६टक्के, मनस्वी विशाल कातुरे ९५ टक्के गुण मिळवले. शाळेचे संचालक निशाजी सराफ, प्राचार्या भारती मालवीय यांनी गुणवंत विद्याथ्र्यांचे अभिनंदन केले.