टिपागड डोंगरावर नक्षल्यांनी पुरुन ठेवली होती स्फोटके !

Naxalist-Gadchiroli पोलिसांनी हुडकले स्फोटके, केली नष्ट

    दिनांक :06-May-2024
Total Views |
गडचिरोली, 
 
 
Naxalist-Gadchiroli लोकसभा निवडणुकीदरम्यान नक्षल्यांनी टिपागड पहाडावर दडवून ठेवलेली शक्तीशाली स्फोटके पोलिसांनी आज, 6 मे रोजी सकाळी हुडकून काढत नष्ट केली. यामुळे मोठ्या प्रमाणात पोलिसांचा घातपात करण्याचा नक्षल्यांचा कट उधळला गेला. Naxalist-Gadchiroli लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 दरम्यान नक्षल्यांनी घातपात करण्याच्या उद्देशाने टिपागड परिसरात काही स्फोटके आणि क्लेमोर माईन्स जमिनीत पुरुन ठेवले होते. याबाबतची माहिती पोलिसांना मिळाली होती. Naxalist-Gadchiroli परंतु त्यावेळी पोलिसांना ही स्फोटके सापडली नाही. Naxalist-Gadchiroli शिवाय मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त असल्यामुळे नक्षल्यांनाही घातपात करता आला नाही.
 
 

Naxalist-Gadchiroli 
 
 
परंतु काल टिपागड परिसरातील एका निश्‍चित ठिकाणी ही स्फोटके आणि क्लेमोर माईन्स पुरुन ठेवण्यात आले असल्याची खात्रीशिर माहिती पोलिसांना मिळाली. Naxalist-Gadchiroli यानंतर पोलिस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने 2 बॉम्प शोधक व नाशक पथकासह सी-60 चे एक पथक आणि सीआरपीएफचे एक क्युएटी पथक डंप शोध मोहिम राबविण्यासाठी पाठविण्यात आले. आज सकाळी जवानांनी टिपागड पहाडावर दडवून ठेवलेली स्फोटके, क्लेमोर माईन्स आणि प्रेशर कुकर्स हुडकून काढली. Naxalist-Gadchiroli पोलिसांना घटनास्थळी स्फोटके भरलेले 6 प्रेशर कुकर, स्फोटकांनी आणि गंजलेले लोखंडी तुकडे भरलेले 3 क्लेमोर माईन्स व रिकामे 3 क्लेमोर माईन्स आढळून आली. शिवाय प्लास्टिकच्या पिशवीत गनपावडर, औषधे आणि ब्लँकेट सापडले. Naxalist-Gadchiroli त्यानंतर बॉम्ब शोधक व नाशक पथकाच्या पोलिसांनी ही स्फोटके व क्लेमोर माईन्स नष्ट केले.