राजकीय पक्षांकडे कार्यकर्त्यांनी पाठ का फिरविली ?

Political Parties-India तेथे कर माझे जुळती...

    दिनांक :06-May-2024
Total Views |
कानोसा
 
 
- अमोल पुसदकर
 
 
Political Parties-India  राजकीय पक्ष असो की सामाजिक संघटना या सर्वांकडेच आजकाल कार्यकर्त्यांचा दुष्काळ पडल्याचे चित्र आहे. काही पक्ष, संस्था त्याला अपवाद आहेत. परंतु, त्यांच्याकडे उपलब्ध असलेले कार्यकर्ते इतरांपेक्षा जास्त असले, तरीही पूर्वी त्यांच्याकडे किती होते आणि आता त्यांच्याकडे किती आहेत, याचा त्यांनी विचार करण्याची आवश्यकता आहे. Political Parties-India तुमच्या जवळचे मुद्दल संपले असेल आणि तुम्ही फक्त व्याजावर दिवस काढत असाल तर ही नक्कीच चिंतेची आणि चिंतनाची गोष्ट आहे. फार पूर्वी नेत्यांनी एक आवाज दिल्यानंतर मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते जमा व्हायचे. नेत्यांचे आवाहन तर दूरच राहू द्या; परंतु त्यांच्या चमच्यांच्या आवाहनावरसुद्धा मोठ्या प्रमाणावर लोक जमा व्हायचे. Political Parties-India  गावातील प्रमुख दोन-चार लोकांना जर पकडले तर संपूर्ण गावाचे मतदान ताब्यामध्ये यायचे; परंतु आता अशी परिस्थिती नाही. आता प्रत्येक जण स्वतंत्र मताचा झालेला आहे किंवा लोकांना जमा करणाऱ्या ठेकेदारांना तो आता मानेनासा झालेला आहे. Political Parties-India  याला कारणीभूत अनेक गोष्टी आहेत.
 
 
 
news
 
 
ज्या वेळेला देश पारतंत्र्यात होता त्यावेळेला समाजाचे नेतृत्व करणारे लोक नि:स्वार्थ होते. अशा त्यागी वृत्तीच्या लोकांकडे पाहून ‘तेथे कर माझे जुळती' अशा पद्धतीची भावना कार्यकर्त्यांमध्ये व सर्वसामान्य जनतेमध्ये उमटत होती. Political Parties-India  परंतु, देश स्वतंत्र झाला, देशामध्ये भ्रष्टाचाराचा शिरकाव झाला. त्यानंतर हळूहळू चित्र बदलत गेले. मोठमोठ्या कामांचे कंत्राट नेत्यांना बायको पोरांच्या नावावर मिळू लागले. त्यांचे उद्योगधंदे स्थापित होऊ लागले. पाहता पाहता ते फारच मोठे झाले. त्यानंतर एक काळ असा आला की, त्यांनी त्यांच्या आजूबाजूच्या दहा-पाच लोकांकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. हे आजूबाजूचे लोक नंतर कार्यकर्त्यांचे ठेकेदार बनले. नेते मंडळीसुद्धा आश्वस्त झाली. Political Parties-India  त्यांना वाटले की, चला सर्वसामान्य कार्यकर्त्याला जवळ करण्याची आवश्यकता नाही. आपण दहा-पाच चमच्यांना सांभाळले तरी ते उर्वरित लोकांना सांभाळत राहतील. करता करता काही खास कृपापात्र लोकांना पेट्रोल पंप, आश्रम शाळा मिळू लागल्या. पाहता पाहता हे लोक मोठे प्रस्थापित बनून गेले. अनेक कार्यकर्त्यांचे यांच्या मागे फिरता फिरता त्यांच्या उमेदीचे वर्ष समाप्त झाले. काहींची राजकीय महत्त्वाकांक्षा होती तर काहींची तीही नव्हती.
 
 
 
Political Parties-India  ज्यांची राजकीय महत्त्वाकांक्षा होती त्यांना या वेळेला ‘तू थांब, पुढल्या वेळेला तुझा नक्की विचार करू,' असे म्हणता म्हणता त्यांची पोरंसुद्धा मोठी होऊन गेली. परंतु यांचा नंबर काही आलाच नाही. असेच दिवस जात गेले आणि मग हे जुने कार्यकर्ते बाजूला पडत गेले. राजकारणाचे गारुड आणि प्रलोभन इतके मोठे होते की, नवनवीन लोकांना त्याचे आकर्षण वाटतच राहिले. विरोधामध्ये बसणारे सत्तेमध्ये आले. Political Parties-India सत्तेमधले विरोधामध्ये गेले. परंतु कार्यकर्ते जिथल्या तिथेच राहिले. शिरगणती पूर्ण करण्यासाठी का होईना जुन्या कार्यकर्त्यांच्या जागेवर निवडणुकीपुरते तरी नवीन लोक येत राहिले. जुने मात्र कायमचे दुरावले. ते फक्त मतदार बनले. काही पक्षांमध्ये विचारधारा नावाची गोष्ट होती. त्यांच्याकडे काही कार्यकर्ते विचारधारा म्हणून लाजेस्तव कायम राहिले. त्यांनी मार्ग बदलला नाही. पक्ष बदलला नाही. तरीसुद्धा ‘पळसाला पाने तीनच' हाच अनुभव त्यांना आला. अजून दिवस पुढे जात गेले. Political Parties-India  मग मात्र कार्यकर्त्यांच्या हे लक्षात आले की, पाच वर्षे काम करून काही उपयोग नाही. सत्ता असली काय आणि नसली काय आपला उपयोग गर्दी जमवण्यासाठी आहे, हे जेव्हा त्यांच्या लक्षात आले त्यावेळेस जेव्हा निवडणुका येतील तेव्हा पाहू. आपण आपल्या कामधंद्याला लागलेले बरे ! असा विचार अनेकांनी केला. त्यामुळे हंगामी स्वरूपाचे कार्यकर्ते तयार होऊ लागले. असे कार्यकर्ते जेव्हा निवडणुका यायच्या त्याच वेळेला कामात यायचे.
 
 
 
Political Parties-India  नंतर पुन्हा पाच वर्षे ते झोपी जायचे. कुठलेही धरणे-आंदोलन म्हटले की, कार्यकर्त्यांपेक्षा पदाधिकारी तिथे मोठ्या प्रमाणावर उपस्थित असतात. असे चित्र सर्वच राजकीय पक्षांमध्ये पाहायला मिळते. बाहेरच्या पक्षामधून आलेल्या आयारामांना प्रतिष्ठा प्राप्त झाली व पक्षनिष्ठांची अवहेलना झाली. या राजकीय कार्यकर्त्यांनी आपल्या पोरासोरांना सांगितले की, बाबांनो आमची अनेक वर्षे येथे वाया गेली आहेत. तुम्ही ही चूक करू नका. तुम्ही शांतपणे आपल्या कामधंद्याचे बघा. त्यामुळे तरुण वर्ग विचारधारा तीच असली, तरी पुन्हा त्यांच्या वाटेला गेला नाही. राजकीय नेत्यांची जादू समाप्त होत गेली. लोकांमधले त्यांचे आकर्षण समाप्त होत गेले. त्यांच्या चकचकीत गाड्या, मोठमोठ्या इमारती, उभे झालेले उद्योग याच्यामुळे कार्यकर्त्यांना त्यांच्याबद्दल असूयाच जास्त वाटत राहिली. राजकीय पक्ष हजारो कार्यकर्त्यांचे पुनर्वसन करू शकत नाही, त्यांना नोकरी देऊ शकत नाही. परंतु सरकारी नाही तर खाजगी नोकरीसाठी प्रयास केले जाऊ शकतात. एखादे मोठे कंत्राट देताना ‘तुझ्याकडे लागणारे मनुष्यबळ तू आमच्या पक्षाच्या लोकांमधून घे,' असे त्याला ठासून सांगितले जाऊ शकते. वेगवेगळ्या गोष्टीच्या एजन्सी आणि सरकारी गोष्टी वाटप करताना यातील काही कार्यकर्त्यांचा विचार केला जाऊ शकतो. ज्यांना तुम्ही नोकरी-व्यवसाय-उद्योग काहीच देऊ शकले नाही; कमीत कमी त्यांना वेगवेगळ्या निमित्ताने सन्मान तरी तुम्ही देऊ शकता.
 
 
 
Political Parties-India  कोरोनाच्या काळामध्ये दवाखान्यामध्ये रुग्णांसाठी पलंग मिळत नव्हते. त्यावेळेस काही लोकांनी आपापल्या ताकदीनुसार कार्यकर्त्यांना पलंग मिळवून देण्याचा प्रयत्न केला. परंतु कार्यकर्त्यांनाही आपल्या घरच्या व्यक्तीसाठी पलंग मिळविण्यासाठी त्रास सहन करावा लागला. नेत्यांच्या ओळखी कामात आल्या नाही. त्यावेळेस मात्र तो नक्कीच विचार करतो की, माझ्याच भरोशावर मला सर्व काही करायचे असेल तर यांची आवश्यकता काय आहे? मग यांनी बोलावल्यावर प्रत्येक ठिकाणी हजर राहण्यापेक्षा जेव्हा मला वेळ असेल तेव्हा मी हजर राहील, अशा पद्धतीचा विचार तो करू लागतो. या अशा विचार चिंतनातूनच कार्यकर्ते राजकीय पक्षांकडे पाठ फिरवितात. पक्षांमध्ये संपत चाललेली विचारधारा, नि:स्वार्थ नेतृत्वाचा अभाव, कार्यकर्त्यांची  संपत चाललेली कदर, पक्षांमध्ये वाढत चाललेली वापरा आणि फेकून द्या, ही मानसिकता, यामुळे बऱ्याच वेळा कार्यकर्त्यांमध्ये ‘मला काय त्याचे?' अशा पद्धतीची प्रवृत्ती निर्माण होते आणि ते पाठ फिरवितात. Political Parties-India  ज्यांना पुढल्या २०-२५ वर्षांची राजकीय योजना करायची आहे, अशा राजकीय पक्षांनी याचा विचार करणे आवश्यक आहे. कुठलाही पक्ष हा जनतेमध्ये पकड असलेल्या कार्यकत्र्यांशिवाय यशस्वी होऊ शकणार नाही. त्या पक्षाचे विचार, त्याचे कार्य हे सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचणार नाही. असे जर झाले तर केवळ वर्तमानपत्र, दूरदर्शन वाहिन्या यांच्यावर जाहिराती देऊन काम भागणार नाही. याचा फटका राजकीय पक्षांना पडेल. त्यामुळे घरोघरी प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचणारा कार्यकर्ता हाच पक्षाच्या विचारधारेचा वाहक आहे आणि त्याला टिकवून ठेवणे हे कोणत्याही काळामध्ये राजकीय पक्षांसाठी आवश्यक आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.