- एसबीसीत समाविष्ठ केल्याने नुकसान
गोंदिया,
Pradhan Mantri Awas Yojana गोरेगाव तालुक्यात मोदी गृहनिर्माण योजनेची कामे सुरु आहे. या योजनेतंर्गत गोवारी समाजाला विशेष मागास प्रवर्गात 2 टक्के आरक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे गोरेगाव तालुक्यात या समाजाची लोकसंख्या मोठी असूनही केवळ 75 लाभार्थ्यांनाच या योजनेचा लाभ मिळाला असून अनेकांना वंचित राहावे लागत आहे.
Pradhan Mantri Awas Yojana यापूर्वी प्रधानमंत्री आवास योजनेत गोवारी समाजाला सर्वसाधारण आरक्षण कोट्यात ठेवण्यात आले होते. ज्यामध्ये ग्रामपंचायत यादीनुसार घरकूल मंजूर केली जात होती. मात्र अलीकडे प्रधानमंत्री आवास योजनेचे मोदी आवास योजनेत रुपांतर करण्यात आले. ज्यात गोवारी समाजाचा समावेश करण्यात आला असून त्यांना विशेष मागासवर्गीय प्रवर्गातून 2 टक्के आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे 100 लाभार्थ्यांपैकी फक्त 2 लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळत आहे. परिणामी अनेक गरजू लाभार्थी लाभापासून वंचित आहेत. गोरेगाव तालुक्यातील 56 ग्रामपंचायतींमध्ये गोवारी समाजाचे मोठ्या संख्येने वास्तव्य आहे. या प्रवर्गातील शेकडो लाभार्थी आजही मोडकळीस आलेल्या घरांमध्ये राहतात. अशा परिस्थितीत या प्रवर्गाला घरकूल योजनेचा लाभ मिळण्याची नितांत गरज आहे. मात्र विशेष मागास प्रवर्गात समाजाला केवळ 2 टक्के आरक्षण असल्याने तालुक्यात केवळ 75 लाभार्थ्यांना घरकूल मंजूर करण्यात आली असून हजारो गरजू लाभार्थी या योजनेपासून वंचित आहेत.