बंगालमधील हुगळीत स्फोट!

एक ठार, दोन गंभीर जखमी

    दिनांक :06-May-2024
Total Views |

blast 
 
कोलकाता,
blast in Hooghly पश्चिम बंगालमधील हुगळीत सोमवारी झालेल्या बॉम्बस्फोटात एका किशोर ठार तर दोन जण जखमी झाले. पोलिसांनी ही माहिती दिली. हुगळी जिल्ह्यातील पांडुआ येथील तलावाजवळ हा स्फोट झाला. मुलांचा एक गट इथे खेळत होता. पोलिसांनी सांगितले की, जखमी किशोरचा पांडुआ येथील रुग्णालयात मृत्यू झाला, तर इतर दोन जखमींना चिनसुरा येथे चांगल्या उपचारांसाठी हलवण्यात आले. या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. स्थानिक भाजपा खासदार लॉकेट चॅटर्जी यांनी या स्फोटात टीएमसीचा हात असल्याचा आरोप केला. पांडुआ येथे टीएमसीचे ज्येष्ठ नेते अभिषेक बॅनर्जी यांच्या प्रचारापूर्वी पश्चिम बंगालच्या सत्ताधारी पक्षाचे हे भयभीत करण्याचे राजकारण असल्याचा दावा त्यांनी केला.