विकसित भारताच्या दिशेने वाटचाल

modi ki guarantee समुदायांमधील सुप्त क्षमता

    दिनांक :06-May-2024
Total Views |
अग्रलेख
modi ki guarantee एकीकडे लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू असतानाच आर्थिक आघाडीवर दोन सकारात्मक बातम्या समोर आल्या आहेत. पहिली बातमी म्हणजे २०२७ पर्यंत भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याची शक्यता ख्यातनाम आंतरराष्ट्रीय संस्था ‘जेफरीज'ने वर्तवली आहे. modi ki guarantee तर, २०२४ ते २०३१ या काळात या दशकाच्या अखेरपर्यंत भारताच्या अर्थव्यवस्थेचा वेग ७.६ ते ७.८ टक्के राहणार असल्याचा अंदाज नामवंत क्रेडिट रेटिंग संस्था ‘डेलॉईट'ने वर्तविला आहे. लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याच्या पृष्ठभूमीवर या दोन महत्त्वाच्या सकारात्मक बातम्या भारतीयांच्या दृष्टीने निश्चितच दिलासादायक व आनंददायक आहेत. modi ki guarantee मोठ्या प्रमाणात जागतिक आव्हाने असूनही आर्थिक व औद्योगिक पातळीवर मोदी सरकारने दाखविलेल्या लवचीकतेचे कौतुक करायलाच हवे. रशिया-युक्रेन युद्ध व तांबड्या समुद्रातील मालवाहतुकीचे संकट यासारख्या भूराजकीय तणावानंतरही केंद्र सरकारच्या लवचीक आणि व्यावहारिक भूमिकेमुळे एकूण निर्यात वाढीत झालेली प्रभावी वाढ ही प्रशंसनीय अशीच आहे. modi ki guarantee एकीकडे पाश्चिमात्य देश आजही त्यांच्या मध्यवर्ती बँकांनी घेतलेल्या दरवाढीच्या धोरणामुळे तोटा सहन करीत असताना आणि अमेरिकेसह संपूर्ण जगाच्या आर्थिक वाढीचा वेग मंदावलेला असताना मार्च महिन्यात व्यापारी तूट कमी होणे व भारताची अर्थव्यवस्था गतिशील आणि बळकट होणे हा शुभसंकेतच आहे.modi ki guarantee
 
 
 
modi ki guarantee
 
 
भारताच्या अर्थव्यवस्थेला गती आणि बळकटी देण्यासाठी तसेच लोकांच्या इच्छा-आकांक्षांना मूर्त रूप देण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारने गेल्या १० वर्षांपासून प्रामाणिक प्रयत्न केले, हे नाकारण्यात अर्थ नाही. अर्थकारण आणि राजकारण या दोन्हींमध्ये मोदी सरकारने उत्तम समन्वय राखला आहे. modi ki guarantee एकीकडे स्वयंरोजगाराला व ग्रामोद्योगांना चालना देत असतानाच दुसरीकडे औद्योगिक उत्पादनात सातत्याने कशी वाढ होईल, याकडेदेखील मोदी सरकारने लक्ष दिले आहे. त्यामुळे पाच ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट समोर ठेवून वाटचाल करणारा भारत हा सातत्याने औद्योगिक उत्पादन वाढीसाठी तसेच निर्यातवृद्धीसाठीदेखील प्रयत्न करीत आहे. केंद्रातील मोदी सरकारच्या स्टार्टअप इंडिया, कौशल्य विकास योजना, आत्मनिर्भर भारत, मेक इन इंडिया, व्होकल फॉर लोकल, एक जिल्हा, एक उत्पादन (ओडीओपी) योजना या साऱ्याच महत्त्वाकांक्षी योजनांमुळे देशाचे अर्थचक्र अधिकच गतिमान झाले, ही वस्तुस्थिती आहे. modi ki guarantee ‘मिशन शक्ती' अंतर्गत आगामी काळात आमच्या माता, भगिनी व मुलींना दर्जेदार शिक्षण व रोजगाराच्या अधिकाधिक संधी कशा उपलब्ध होतील, यादृष्टीने आम्ही सातत्याने कार्यरत राहू, असे अभिवचन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहे. मोदी सरकार पुन्हा तिसèयांदा सत्तेवर आल्यास या वचनाची पूर्तता करेल याची महिलाशक्तीला पूर्ण खात्री आहे.
 
 
 
modi ki guarantee ‘हा विकसित भारताचा संकल्प आहे. आता देश छोटी स्वप्ने पाहणार नाही व लहानसहान संकल्पही करणार नाही तर आमची स्वप्नेही मोठी असतील आणि संकल्पही प्रचंड असतील. भारताचा विकास करायचा आहे, हे आमचे स्वप्न आणि संकल्पही आहे,' असे मोदी सध्या देशभरातील प्रचारसभांमध्ये तरुणाईला सांगत आहेत. ही ‘मोदी की गॅरंटी' भारतीयांच्या सुरक्षित आणि दर्जेदार जीवनासाठी नक्कीच महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे ‘मोदी की गॅरंटी' म्हणजे प्रतिकूलतेवर मात करण्याची इच्छाशक्ती ठेवणे व धैर्य, आत्मविश्वास जागविणे होय, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. modi ki guarantee त्यामुळे आज वास्तववादी विचार करून देशाला आर्थिक आघाडीवर पुढे नेणाऱ्या व देशवासीयांना कृतिशील, पुरुषार्थी बनवणाऱ्या देशभक्त राज्यकत्र्यांची नितांत आवश्यकता आहे. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेखाटलेल्या ‘विकसित भारत संकल्पचित्रा'त देशातील तरुण, बुद्धिमान, क्रियाशील व उत्साही उद्योजकांनी आपले योगदान दिले पाहिजे. वस्तुस्थिती ही आहे की, पहिल्यांदा म्हणजेच मे २०१४ मध्ये देशाची सत्तासूत्रे हाती घेतल्यानंतर लगेचच केंद्रातील मोदी सरकारने देशाच्या पुनर्बांधणीचे कार्य हाती घेतले होते आणि २०२४ पर्यंत हे सुरूच होते. modi ki guarantee देशाची पुनर्बांधणी म्हणजे सर्वच स्तरावर अर्थात आर्थिक, औद्योगिक, सामाजिक, शैक्षणिक व अन्य सर्वच क्षेत्रांत व्यापक व गुणात्मक परिवर्तन होय. हे कार्य मुळीच सोपे नाही.
 
 
 
 
यासाठी प्रखर इच्छाशक्ती, सातत्य, प्रयत्न, अविरत कष्ट आणि दूरदृष्टी लागते. या सर्व गोष्टी मोदी सरकारमध्ये आहेत. त्यामुळेच गेल्या ९-१० वर्षांत सर्वच आघाड्यांवर व्यापक व सकारात्मक परिवर्तन झाले असून त्याचे चांगले परिणामही दिसून येत आहेत. जेफरीज आणि डेलॉईट या संस्थांनी वर्तविलेले अंदाज त्याचेच द्योतक आहे. modi ki guarantee जगातील सर्व आधुनिक पायाभूत सुविधा साध्य करण्यासाठी पंतप्रधानांनी ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास,' असा नारा दिला. २०२४ पासून भारताचा विकसित देश बनण्याच्या दिशेने प्रवास सुरू झाला असून विकासाच्या दृष्टीने पुढचे दशक हे भारताचेच राहणार आहे, अशी ग्वाही आमच्या पंतप्रधानांनी यापूर्वीच दिली आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे विकसित भारताचा संकल्प साध्य होण्यासाठी देशातील तरुण उद्योजक, स्टार्टअप्स यांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. कारण ‘विकसित भारत' ही केवळ आकर्षक अथवा लक्षवेधी घोषणा नसून तो आपल्या सर्वांचा उद्देश आहे. modi ki guarantee हे आपणच म्हणजेच देशवासीयांनी स्वत:ला दिलेले एक लक्ष्य आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकसित भारत संकल्पनेला पुढे नेण्यासाठी देशातील प्रत्येक घटकाचे त्यामध्ये योगदान आवश्यक आहे. 
 
 
 
modi ki guarantee  २०१४ पूर्वीच्या भारतात म्हणजेच काँग्रेसप्रणीत संपुआ सरकारच्या राजवटीत प्रचंड भ्रष्टाचार, राष्ट्रवादी वृत्तीचा अभाव, तुष्टीकरणाचे घातक राजकारण, घराणेशाही व राजकीय इच्छाशक्तीचा अभाव यांच्यामुळे देशाच्या विकासात अनेक अडथळे आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगमनानंतर देशातील व्यवस्थेमध्ये चैतन्य निर्माण झाले असून गेल्या १० वर्षांत भारताने नाजूक पाच अर्थव्यवस्था ते सर्वोच्च पाच अर्थव्यवस्था असा प्रवास केला आहे. पाच ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने भारत करीत असलेल्या उल्लेखनीय वाटचालीमुळे देशातील तरुणांसाठी अनेक जागतिक संधी उपलब्ध होत आहेत. modi ki guarantee ‘विकास भी विरासत भी' या संकल्पनेनुसार आपली ओळख आणि अभिमान जपून विकास साधला जात आहे. आधुनिक भारताच्या इतिहासात प्रथमच भारत हा अतिशय महत्त्वाच्या अशा टप्प्यावर उभा आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे भारतीय नागरिकांमध्ये आत्मनिर्भरता निर्माण करणे किंवा आत्मनिर्भरता वाढवण्यावर भर देणे, हे मोदींच्या शासकीय धोरणाचे वैशिष्ट्य आहे. राज्यावर अर्थात सरकारवर अवलंबित्वाची संस्कृती कायम ठेवण्याऐवजी, मोदी सरकारने व्यक्तींमधील आणि समुदायांमधील सुप्त क्षमता बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आहे.modi ki guarantee
 
 
कल्याणकारी कार्यक्रमांच्या माध्यमातून सहाय्य प्रदान करून, कुटुंबांना सरकारी मदतीवर दीर्घकाळ अवलंबून राहण्याच्या बंधनातून मुक्त होण्यासाठी सशक्त केले गेले आहे. यामुळे नागरिकांमध्ये स्वयंपूर्णता आणि सन्मानाची भावना वाढली आहे. विकसित राष्ट्र बनत असताना पुढील दशकात आपली वाटचाल कशी असेल, यावर आपले भवितव्य अवलंबून आहे. देशाला पुन्हा गतवैभव प्राप्त करून द्यायचे असेल तर पंतप्रधानांनी काही महिन्यांपूर्वी ‘पंचप्राणांचा' उल्लेख केला होता. modi ki guarantee विकसित भारताचे ध्येय साध्य करण्यासाठी वसाहतवादी, गुलामगिरीची मानसिकता झुगारून देणे, आपल्या मुळांचा, एकतेचा अभिमान बाळगणे, नागरिकांमध्ये कर्तव्याची भावना निर्माण करणे, नवीन शक्यता, संभावना जोपासणे व नवे संकल्प लक्षात घेऊन आत्मविश्वासाने पुढे जाणे हे ते पंचप्राण होत. देशाला अधिक गतीने पुढे नेण्यासाठी सामूहिक प्रयत्न आणि सांघिक प्रयत्नांना पर्याय नाही, हे लक्षात घेतले पाहिजे.