निवडणूक कामाचा मोबदला नियमानुसार द्या !

Election 2024-Gondia ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाची मागणी

    दिनांक :07-May-2024
Total Views |
गोंदिया, 
 
 
Election 2024-Gondia भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात 19 एप्रिल रोजी पार पडलेल्या मतदान प्रक्रियेदरम्यान 2 दिवस कर्तव्य बजावणार्‍या ग्रामपंचायत कर्मचार्‍यांना नियमानुसार कामाचे मानधन देण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाने निवेदनानतून जिल्हाधिकारी प्रजित नायर व उपजिल्हा निवडणूक अधिकारी किरण अंबेकर यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. Election 2024-Gondia निवेदनानुसार, लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचार्‍यांनी दोन दिवस कर्तव्य बजावले. या लोकसभा क्षेत्रात भंडारा व गोंदिया या दोन जिल्ह्याचा समावेश आहे.
 
 
Election 2024-Gondia
 
Election 2024-Gondia मानधन अदा करताना भंडारा जिल्ह्यातील कर्मचार्‍यांना 700 रुपये मानधन देण्यात आले. मात्र गोंदिया जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचार्‍यांना नियमाला डावलून केवळ 350 रुपये देण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे कर्मचार्‍यांनी मानधनाची निधी घेण्यास नकार दिला. Election 2024-Gondia ही बाब 19 एप्रिल रोजी महासंघाचे कार्याध्यक्ष मिलिंद गणवीर यांनी निवडणूक अधिकार्‍यांच्या निदर्शनास आणून देऊन नियमानुसार व शासन निर्णयाप्रमाणे 700 रुपये अदा करण्याची मागणी केली. मात्र त्यानंतर संबंधित अधिकार्‍यांनी कोणतीच कार्यवाही केली नाही.
 
 
 
दरम्यान यासंदर्भात 6 मे रोजी महासंघाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी व उपजिल्हाधिकार्‍यांची भेट आपली मागणी सांगितली.
Election 2024-Gondia प्रसंगी अधिकार्‍यांनी त्वरित कार्यवाही करून नियमानुसार मोबदला देण्याचे मान्य केले. तर आश्‍वासनाची पूर्तता न झाल्यास जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचारी आंदोलन करण्याचा इशारा महासंघाने दिला. यावेळी महासंघाचे मिलिंद गणवीर, देवेंद्र मेश्राम, विनोद शहारे, सुनील लिल्हारे, मुकेश बिसेन, मुरलीधर पटले, रामेश्‍वर उके उपस्थित होते.Election 2024-Gondia