उष्णतेची लाट, अवकाळीचाही इशारा !

climate change-Vidarbha दुपारी शुकशुकाट

    दिनांक :07-May-2024
Total Views |
वेध
 
 
- नितीन शिरसाट
climate change-Vidarbha प्रत्येक शहराचे एक भौगोलिक वैशिष्ट्य असते. हवामानाची माहिती देताना ती बाब विचारात घ्यावी लागते. त्याशिवाय शहराच्या आसपासच्या परिसरातील हवामान, वर्षातील ऋतू-वेळ या सगळ्यांचा अंदाज घेऊन हवामानाची माहिती सादर केली जाते. climate change-Vidarbha ‘हवामान' हा शब्द वातावरणाच्या तात्पुरत्या स्थितीचा निदर्शक आहे. आपापल्या परिसरातील वातावरणाच्या अनुषंगाने आपण एकूण हवामानाचा विचार करतो. मात्र, हवामान हे पाण्यात गारगोटीसारखे कार्य करते. गारगोटी पाण्यात टाकल्यानंतर तिचे तरंग पाण्यात दूरपर्यंत उमटतात. climate change-Vidarbha जगभरातील हवामानाच्या बाबतीतही हेच घडते. मानवी जीवनावर हवामानाचा अनेक प्रकारे परिणाम होतो. दिवसागणिक बदलणारे हवामान वाढते. प्रचंड तापमान, वादळ, चक्रीवादळ आणि हिमवादळ यामुळे होणाऱ्या गंभीर नुकसानीमुळे मानवी जीवनाची वाताहत होते. climate change-Vidarbha राज्यात पुढील काही दिवस विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पाऊस आणि उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे.
 
 

climate change-Vidarbha 
 
 
 
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. विदर्भासह मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाच्या सरी पाहायला मिळतील, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. पुढील चार ते पाच दिवस विदर्भात आणि संलग्न मराठवाड्यातील जिल्ह्यांत काही ठिकाणी विजांचा कडकडाट आणि जोरदार वारे वाहण्याची शक्यता असून पावसाचाही अंदाज आहे. climate change-Vidarbha तसेच काही भागांत गारपीट होण्याचीही शक्यता आहे. दरम्यान, काही भागांत तापमान वाढण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात विदर्भ आणि मराठवाड्याला उष्णतेच्या झळांचा सामना करावा लागला. राज्यात सर्वाधिक ४४.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद अकोला येथे झाली. त्याखालोखाल अमरावती ४३.८, चंद्रपूर ४३.८, गडचिरोली, वर्धा आणि वाशीम ४३.०, बीड ४३.१, सोलापूर ४३.४, जळगाव ४२.३, मराठवाड्यात परभणी येथे ४३.६ अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. climate change-Vidarbha
 
 
 
उष्णतेची लाट निर्माण झाल्याने दुपारी रस्त्याने अनेक ठिकाणी शुकशुकाट असतो. लग्नसराई असल्याने त्याचा परिणाम बाहेरगावी जाणारे प्रवासी, वऱ्हाडी बसस्थानकावर कमी झाले आहेत. भौगोलिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून महत्त्वाचा ‘शून्य सावली दिवस' महाराष्ट्रात ३ मे ते ३१ मे दरम्यान येणार आहे. climate change-Vidarbha विद्यार्थी आणि संशोधन करणाऱ्या नागरिकांनी या भौगोलिक घटनांचा अभ्यास आणि निरीक्षण करावे, असे आवाहन खगोल अभ्यासकांनी केले आहे. अवकाळी पाऊस आणि तापमानातील फरक यामुळे बागायती क्षेत्राला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. ग्लोबल वॉर्मिंगशी संबंधित दुष्काळ, पूर, गारपीट इत्यादी फळबाग लागवडीत गुंतलेल्या शेतकऱ्यांसाठी घातक ठरू शकतात. हवामान बदलामुळे तापमान वाढल्याने पशुधन उत्पादन आणि आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. climate change-Vidarbha बदलत्या हवामानाचा सामना करताना देशांतर्गत अन्न उत्पादन टिकवून ठेवण्याच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी भारतीय कृषी संशोधन परिषद, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकार यांनी ‘नॅशनल इनोव्हेशन्स इन क्लायमेट रेझिलिएंट अ‍ॅग्रिकल्चर' हा प्रमुख नेटवर्क प्रकल्प सुरू केला.
 
 
 
योजनांद्वारे हवामान बदलाशी मुकाबला करण्यासाठी भारत सरकार कटिबद्ध आहे. शाश्वत शेती, आरोग्य, हिमालयीन परिसंस्था, शाश्वत अधिवास, हरित भारत आणि हवामान बदलासाठी धोरणात्मक ज्ञान. सर्व हवामान कृतींसाठी एक व्यापक उपक्रमप्रदान करते. गावातील ८० टक्के लोकांचा व्यवसाय शेती असताना त्यासाठी आवश्यक असणारे हवामान केंद्र मात्र दिसत नाही. ज्या ठिकाणी विशेषतः कृषी विज्ञान केंद्रांनी स्वयंचलित हवामान केंद्र बसवलेले आहे, तेथील शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन मिळते. शेतकरी समृद्ध होण्याकडे वाटचाल करीत आहेत. बाजारात साधारण स्थानिक हवामान केंद्राची किंमत ३५ हजारांपासून एक ते दीड लाखापर्यंत आहे. या हवामान केंद्रामधील सर्व नोंदी दर १० मिनिटाला स्वयंचलित पद्धतीने घेतल्या जातात.
 
 
 
पीक नुकसान मदतीसाठी स्वयंचलित हवामान केंद्र त्यामध्ये भ्रमणध्वनीचे सिमकार्ड टाकले तर लोकांना या नोंदी मोफत पोहोचू शकतात. या सर्व माहितीचा उपयोग योग्य कृषी सल्लागाराची मदत घेऊन केला तर याचा शेती आणि उत्पादनात भरपूर उपयोग होतो. हवामान केंद्र हा स्मार्ट शेतीचा पहिला पाया आहे. climate change-Vidarbha पावसाळा सुरू होण्यापूर्वीच प्रत्येक ग्रामपंचायतीने शासन योजना, अनुदानाची वाट न बघता आपल्या गावात हवामान केंद्र त्वरित बसवून स्मार्ट शेती करायला हवी. माणसाच्या वेगवेगळ्या कृत्यांमुळे पृथ्वीचे तापमान वाढतेय आणि मानवी आयुष्याला धोके निर्माण होत आहेत. याविषयी पावले उचलली नाहीत तर माणूस आणि निसर्ग या दोन्हींना धोका निर्माण होईल.
 
 
९८८१७१७८२८