मतदानापासून वंचित कर्मचार्‍यांची संख्याच कळेना

Amravati-ECI-Election 2024पाचशे शिक्षक वंचित

    दिनांक :08-May-2024
Total Views |
तभा वृत्तसेवा
 
 
अमरावती, 
 
 
Amravati-ECI-Election 2024 जिल्ह्यात कर्तव्यावर असलेले शिक्षक व इतर कर्मचारी मतदानापासून वंचित राहल्याची ओरड होत असताना अशा किती कर्मचार्‍यांचे मतदान झाले नाही, याबाबत निवडणुक विभागाकडे देखील आकडे नाही. Amravati-ECI-Election 2024 परंतु, जिल्ह्यातील सुमारे 500 शिक्षक व कर्मचारी मतदानापासून वंचित राहील्याचा दावा करीता प्रहार शिक्षक संघटनेने केंद्रीय निवडणुक आयोगाकडे तक्रार करून मतदानाची सुविधा बॅलेट पेपरव्दारे उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.जिल्ह्यात 26 एप्रिल रोजी लोकसभेकरीता मतदान पार पडले. Amravati-ECI-Election 2024 या मतदान प्रक्रियेत सुमारे 8700 कर्मचार्‍यांनी निवडणुकीचे कर्तव्य बजाविले. विटभट्टींवरील कारवाईने संताप, नंतर कारवाईला 20 मे पर्यंत स्थगिती !
 
 
 
Amravati-ECI-Election 2024
 
 
यामध्ये जिल्हाबाहेरील मतदार असलेल्या कर्मचार्‍यांना बॅलेट पेपर तर लोकसभेतील रहीवासी असलेल्या कर्मचार्‍यांकरीता इडीसी प्रणालीव्दारे आहे त्याच मतदान केंद्रावर मतदानाची सुविधा देण्यात आली होती. Amravati-ECI-Election 2024 असे असताना जिल्ह्यातील बहुतांश कर्तव्यावर असलेल्या कर्मचार्‍यांना ईडीसी मिळालीच नाही तर काहींना बॅलेट देखील प्राप्त न झाल्याने ते मतदानापासून वंचित राहल्याची ओरड सुरू झाली. दरम्यान प्रहार शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष महेश ठाकरे यांनी याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली. Amravati-ECI-Election 2024 परंतु, नेमके किती कर्मचारी मतदानापासून वंचित राहीले याचा आकडाच मात्र प्रशासनाकडून उपलब्ध झाला नाही. याबाबतची तक्रार महेश ठाकरे यांनी केंद्रीय निवडणुक आयोगाकडे करून त्वरीत मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.
 
 
Amravati-ECI-Election 2024 नेमके किती कर्मचारी मतदानापासून वंचित आहे, हे सांगता येणार नाही. परंतु यामध्ये प्रशासनाची चुक नसून बहुतांश कर्मचार्‍यांना वारंवार सुचना देवून सुध्दा काहींनी प्रशिक्षण तसेच जेथे मतदानाची सुविधा केली होती, तेथे मतदानच न केल्याचे दिसून आले आहे. Amravati-ECI-Election 2024 काहींनी पहील्या प्रशिक्षणानंतर दुसर्‍या प्रशिक्षणात कामची जागा बदलविल्याने त्यांची पहील्या प्रशिक्षणात मतदान प्रक्रिया झाली होती. परंतु, कामची जागा कोठे बदलली याची माहीती त्यांनी दिली नसावी, अशीही शक्यता आहे. येथून 5648 कर्मचार्‍यांना इडीसी पाठविले आहेत.
-ज्ञानेश्वर घ्यार
नोडल अधिकारी बॅलेट पेपर