सेलूच्या धीरजने देशात पटकावला 15 वा क्रमांक

Selu-Wardha-UPSC आदिवासी आश्रमशाळेचा विद्यार्थी

    दिनांक :08-May-2024
Total Views |
तभा वृत्तसेवा
 
 
सेलू, 
 
 
Selu-Wardha-UPSC आदिवासी आश्रमशाळेतील शिपायाचा मुलगा धीरज कापटे याने यूपीएससी अंतर्गत घेण्यात आलेल्या एअर सेफ्टी ऑफिसर अर्थात हवाई सुरक्षा अधिकारी परीक्षेत यश संपादन केले आहे. Selu-Wardha-UPSC पहिल्याच प्रयत्नात देशात 15 वा क्रमांक मिळवला. गेल्या वर्षी युपीएससी परीक्षेत 44 पदांसाठी एअर सेफ्टी ऑफिसरची भरती करण्यात आली होती. डिसेंबर महिन्यात परीक्षा घेण्यात आली होती. त्यानंतर एप्रिल महिन्यात मुलाखती घेण्यात आल्या.Selu-Wardha-UPSC
 
 
Selu-Wardha-UPSC
 
धीरजने या परीक्षेत देशातून 15 वा क्रमांक मिळवून यश संपादन केले. धीरजचे वडील राजेंद्र हे सेलू तालुक्यातील वडगाव जंगली येथील कै. लक्ष्मणराव मानकर आदिवासी आश्रमशाळेत शिपायी म्हणून कार्यरत आहेत तर आई गृहिणी आहे. Selu-Wardha-UPSC धीरजचे प्राथमिक शिक्षण वडगाव जंगली येथील प्राथमिक शाळेत झाले. दीपचंद चौधरी शाळेतून माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. घरची परिस्थिती हलाखीची असूनही त्याच्या आई-वडिलांनी धीरजला उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्यानंतर धीरजने कानपूर आयआयटीमधून एमटेकपर्यंत शिक्षण घेतले.
 
 
 
Selu-Wardha-UPSC तो एक वर्षापासून दिल्लीत अभ्यासासाठी राहत होता. धीरजने आपल्या यशाचे श्रेय आई मीना, वडील राजेंद्र, शिक्षक मोरे, कामडी, वानखेडे, वंदिले, चव्हाण, वडुलकर व मित्र परिवाराला दिले आहे. हवाई सुरक्षा अधिकारी पदाची भरती फक्त युपीएससी अंतर्गत केली जाते. मला अधिकारी व्हायचे होते. Selu-Wardha-UPSC त्यामुळे कानपूर आयआयटीमधून एमटेक केल्यानंतर आपण एक वर्षापासून दिल्लीत या परीक्षेची तयारी करत होतो. परिश्रमानंतर मला यश मिळाले असल्याचे धीरज कापटे यांने सांगितले.