गोंदिया,
Child Marriage : अक्षय तृतीयेचा मुहूर्त विवाहासाठी शुभ मानला जातो. याचे औचित्य साधून जिल्ह्यात बाल विवाह होणार नाहीत ना, याकडे बालविकास विभागाची करडी नजर राहणार आहे. असे विवाह जिल्ह्यात आढळल्यास गुन्हा दाखल केला जाणार आहे. बालविवाह करणे कायद्याने गुन्हा आहे. भारतात बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006 हा कायदा करण्यात आला आहे. नोव्हेंबर 2007 पासून हा कायदा अंमलात आला.

बालविवाहाचा सामाजिक स्वास्थ्यावर दूरगामी परिणाम दिसून येतो. कायद्यानुसार मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण नसेल व मुलाचे वय 21 वर्षे पूर्ण नसेल आणि विवाह झाला असेल तर तो बालविवाह ठरतो. राज्यात अक्षय तृतीया हा सण शुभमुहूर्त मानला जातो. या मुहूर्तावर बहुतांश बालविवाह केले जातात. बालविवाह केल्यास कायद्यानुसार 1 लाख रुपये दंड आणि 2 वर्षांपर्यंत सक्तमजुरीची शिक्षा होऊ शकते. बालविवाह झाल्यास नातेवाईक, बालविवाह झालेल्या जागेचे मालक, बालविवाह लावून देणारे धर्मगुरू यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो. 10 मे रोजी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर जिल्ह्यात बालविवाह होत असल्यास ग‘ामसेवक, बालविकास प्रकल्प अधिकारी, जवळचे पोलिस स्टेशन, जिल्हा बाल संरक्षण कक्ष आणि चाईल्ड लाईन (1098) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
शिक्षण विभागाने केली व्यापक जागृती
जिल्ह्यात बालविवाह होऊ नये यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने 1 ते 9 एप्रिल या कालावधीत व्यापक प्रमाणात 65 कार्यक‘मांद्वारे विविध उपक‘म राबवून जनजागृती केली. आठही तालुक्यातील 1367 शाळांमधील 80707 विद्यार्थी जनजागृती उपक‘मात सहभागी झाले. तर 8071 व्यक्तिींनी यात सहभाग घेतला. आठही तालुक्यातील शहरांत, गावांत, चौका-चौकात पथनाट्य, ग‘ामसभा, चर्चासत्र, निबंध, चित्रकला, घोषवाक्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. वैद्यकीय मार्गदर्शन, कायदा व जनजागृती चर्चासत्र, बालविवाहाचे परिणाम आदी बाबींवर जागृती करण्यात आली. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर बालविवाह होऊ नये याकरिता सर्व अधिकारी-कर्मचार्यांनी दक्षता घ्यावी, कुठेही बालविवाह होत असल्यास त्वरित शिक्षण विभागाला कळवावे, असे आवाहन माध्यमिकचे शिक्षणाधिकारी महेंद्र गजभिये यांनी केले आहे.