नागपूर,
Tip Top Convent राज्य शासनाद्वारे दरवर्षी इयत्ता ५ आणि इयत्ता ८वीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येते. नुकतेच या परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात आले. यामध्ये टिप टॉप कॉनव्हेंटचे इयत्ता ५ वीचे ८आणि इयत्ता ८ वीचे ९ विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले आहेत. इयत्ता पाचवीचे अधीश देशमुख , आदित्य गुप्ता , कु.रिद्धी आमदरे , कु. अनया सागोळे,कु. ईशा अंबुलकर ,पुष्कर उमप, कु. कनक लारोकर आणि अंश ठाकरे हे शिष्यवृत्ती साठी पात्र ठरले आहेत. इयत्ता आठवीतले प्रेरक हाडके,कु. श्रावणी थोरात, अंगद वानकर, क्रिशय विश्वकर्मा, सिद्धेश महाजन, भावेश बारई, आदित्य सोरटे , कु. आकांक्षा डांगे आणि कु. गुंजन भगत हे समाविष्ट आहेत. या विद्यार्थ्यांना शाळेचे रमेश गाडरे यांचे मार्गदर्शन लाभले.मुख्याध्यापिका डॉ. केतकी सिरास यांनी सर्व गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे अभिनंदन केले आहे.
सौजन्य: डॉ. केतकी सिरास,संपर्क मित्र