विवाहित महिले सोबत अनैसर्गिक कृत्य

पती सह सहा लोकांवर गुन्हे दाखल

    दिनांक :09-May-2024
Total Views |
मानोरा, 
Unnatural act with married woman : विवाहित महिलेस पत्नीचा दर्जा न देणे, चार चाकी वाहन घेण्यास वडिलांकडून पैशाचा तगादा लावणे, अनैसर्गिक कृत्य करून मानसिक छळ करणार्‍या पतीच्या विरोधात पत्नीने दाखल केलेल्या तक्रारीनुसार मानोरा पोलिस स्टेशन मध्ये विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून पोलिसांनी प्रकरण तपासात घेतले आहे.
 
 
sajk
 
पोलिस सूत्राकडून प्राप्त माहिती नुसार मानोरा येथील एका शिक्षकाची मुलगी हिचा विवाह यवतमाळ येथील सुमित अनिल दातार यांचे सोबत २ मे २०२२ ला कारंजा येथे मंगल कार्यालयात समाजाच्या रितिरिवाज नुसार सपन्न झाला. लग्नात विवाहित महिलेच्या वडिलांनी भरपूर पैसा खर्च केला. जावाई पिंपरी चिंचवड जिल्ह्यातील पुनावडे येथे असल्याने आंदनाचे भांडे येथे येऊन दिले. लग्ना झाल्यावर तीन महिने पतीने चांगली वागणूक दिली. कामानिमित्त फिर्यादी महिलेचा पती ज्या ठिकाणी काम करायचे त्या ठिकाणी एका महिले सोबत ओळख झाली त्या महिलेस तो घरी घेऊन यायचा जेवण करायचे याबाबत विरोध केला असता मला त्रास द्यायचा. मला माझी इच्छा नसतांना जबरदस्तीने माझे वर अनैसर्गिक कृत्य केले, मला दोन वर्षात पत्नीचा दर्जा दिला नाही. चार चाकी वाहन घेण्यासाठी वडिलांकडून पैसे आण म्हणून शारीरिक मानसिक त्रास दिला.
 
 
पुनावडे येथे सासरची मंडळी भेटण्यासाठी आली असता सासू, सासरे, नंनद व नंदोई यांना हकीगत सांगितली. यावेळी एका खोलीत बोलावून विवाहित महिलेचा विनयभंग केला अशी फिर्याद पीडित महिलेने मानोरा पोलिस स्टेशनला दिल्याने आरोपी पती सुनील दातार, सासरा अनिल दातार, सासू नंदोई, नंनद व एक महिला असे सहा आरोपी विरुद्ध कलम ३७७,४९८,३५४ भादवी गुन्हा दाखल करून ठाणेदार प्रवीण शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली एपिआय खंडेराव अधिक तपास करीत आहे.