तहसीलदारांच्या खोटी स्वाक्षरीने हजारो ब्रास रॉयल्टीची चोरी

09 May 2024 20:19:36
मानोरा,
 
 
Washim-Corruption तीर्थक्षेत्र पोहरादेवी व उमरी खुर्द येथे येथील मंदीर बांधकामाला लागणारे गौण खनिज (रॉयल्टी) चे प्रमाणपत्रावर तहसीलदार यांची खोटी स्वाक्षरी पोहरादेवी येथील भिका रामदास राठोड या व्यक्तीने केल्याचा प्रकार उघडकीस आला असून, वडगाव शिवारातून हजारो ब्रास गौण खनिज (मुरूम) ची रॉयल्टी काढल्याची माहिती प्राप्त झाली आहे.Washim-Corruption
 
 

Washim-Corruption 
 
 
विवाहित महिले सोबत अनैसर्गिक कृत्य  पोहरादेवी व उमरी खुर्द येथे शासनाच्या वतीने मंदिराच्या विकास कामासह विविध विकास काम सुरू आहे. सदर विकास कामे नागपूर येथील सुपर कन्स्ट्रक्शन कंपनी मार्फत सुरू आहे. Washim-Corruption विकास कामासाठी लागणारे गौण खनिज (मुरूम) पोहरादेवी येथील भिका रामदास राठोड या व्यक्तीने गेल्या काही दिवसात सुमारे एक हजार ब्रास मुरूमाची रॉयल्टी तहसीलदार यांची खोटी स्वाक्षरी करून काढलेली आहे. सदरील प्रकार धक्कादायक असून, यापूर्वीही अशा प्रकारे खोटी स्वाक्षरी करून कोणी, किती गौण खनिजाची रॉयल्टी काढली असेल याबाबतची चौकशी होणे गरजेचे आहे.Washim-Corruption
 
 
 
गौण खनिज प्रमाणपत्रानुसार ३१ जानेवारी २०२३ रोजी ३०० ब्रास, १९ ऑक्टोंबर रोजी २०० ब्रास, २७ फेब्रुवारी २०२४ रोजी ४०० ब्रास एवढे प्रमाणपत्र खोटी स्वाक्षरी करून रॉयल्टी काढण्यात आली आहे. या प्रकरणी जिल्हाधिकारी व तहसिलदार दोशीवर कोणती कार्यवाही करणार याकडे तालुका वासीयांचे लक्ष लागले आहे. Washim-Corruption तिन्हीही गौण खनिज रॉयल्टी प्रमाण पत्रावरील स्वाक्षरी माझी नाही. त्यावेळी मी रुजूही झालो नव्हतो. तहसीलदारांची खोटी सही करून गौण खनिज रॉयल्टी काढणे ही बाब गंभीर आहे. सदरील प्रकरणाची चौकशी सुरू असुन दोषीवर कार्यवाही केली जाईल, अशी प्रतिक्रिया विचारले असता तहसीलदार संतोष येवलीकर यांनी दिली.Washim-Corruption
Powered By Sangraha 9.0