आनंददायी मान्सून !

Happy Monsoon India मान्सून अविभाज्य घटक

    दिनांक :10-Jun-2024
Total Views |
वेध
- चंद्रकांत लोहाणा
 
 
Happy Monsoon India संपूर्ण देशाची अर्थव्यवस्था सांभाळणारा मान्सून यावर्षी दोन दिवस आधी विदर्भामध्ये दाखल होत आहे. मुंबईकर ज्याची आतुरतेने वाट बघत होते, तो मान्सून अखेर यवर्षी रविवारी मुंबईमध्ये दाखल झाला आहे. दरवर्षी सर्वसामान्यपणे मान्सून ११ जून किंवा त्यानंतर मुंबईमध्ये दाखल होत असतो. परंतु, त्याचे दोन दिवस आधी आगमन ही आनंदवार्ता आहे. मान्सून हा शब्द मूळचा अरेबियन भाषेमधील आहे. Happy Monsoon India सुरुवातीला ब्रिटिशांनी हा शब्द वापरण्यास सुरुवात केली. आशिया खंडामध्ये ठरावीक काळात म्हणजे जून ते सप्टेंबर या काळामध्ये पडणारा पाऊस असा त्याचा अर्थ होतो. या चार महिन्यांच्या कालावधीमध्ये होणाऱ्या  पावसावरच भारतासह आशिया खंडामधील अर्थव्यवस्था अवलंबून आहे. अर्थव्यवस्थेचा कणा असलेली शेती पूर्णपणे मान्सूनवर अवलंबून आहे. Happy Monsoon India अंगाची लाही लाही करणाऱ्या मे महिन्यानंतर प्रत्येक जण मान्सूनच्या आगमनाची आतुरतेने वाट बघत असतो. अशा या मान्सूनच्या पावसाचा थेट संबंध सूर्यदेवतेशी आहे.
 
 
 
 
Happy Monsoon India
 
 
 
पृथ्वीशी सूर्याचा कोन ज्या प्रकारे तयार होतो, त्यानुसार मान्सूनची स्थिती बदलत जाते. मकर संक्रांतीला सूर्य मकरवृत्तावर म्हणजे दक्षिणेकडे असतो. त्यानंतर सूर्याचे पूर्व गोलार्धाकडे भ्रमण सुरू होते. या भ्रमण काळामध्ये पृथ्वीच्या वातावरणातील हवा तापण्याची प्रक्रिया सुरू होते. Happy Monsoon India त्यामुळे पाण्याच्या पृष्ठभागाचेही तापमान वाढत जाते. त्यामुळे हवेचा दाब कमी होऊन अधिक दाबाकडून कमी दाबाकडे वारे वेगाने वाहतात. जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहणारे वारे पाण्याने भरलेले ढग आपल्यासोबत वाहून आणतात आणि याच ढगांमुळे पाऊस पडतो. मान्सूनचा सबंध थेट शेतीशी जरी असला तरी त्याचा प्रभाव अन्य दुसèया क्षेत्रावरही दिसून येतो. भारतामध्ये पडणाऱ्या पावसावर समुद्रातून आलेल्या वाऱ्याचाही प्रभाव पडतो. त्यामुळे कधी अल निनो स्थितीला भारतीयांना सामोरे जावे लागते. Happy Monsoon India तर कधी ‘ला निना' स्थितीशी सामना करावा लागतो. अल निनोमध्ये दक्षिण अमेरिकेच्या किनारपट्टीवरील पॅसिफिक महासागराचे पाणी तापते आणि तेथे कमी दाबाचा पट्टा तयार होतो. त्यामुळे भारताकडे येणारे काही मोसमी वारे दक्षिण अमेरिकेच्या दिशेने सरकतात.
 
 
 
अशा परिस्थितीमध्ये भारतामधील मान्सून कमजोर पडतो. या उलट ‘ला निना' स्थितीमध्ये होते. अशावेळी अरबी समुद्र आणि हिंद महासागरामधील पाणी थंड होते. त्यामुळे तेथे जास्त दाबाचा पट्टा तयार होतो. त्यामुळे हे वारे जास्त दाबाच्या पट्ट्याकडून भारतामधील कमी दाबाच्या पट्ट्यात वाहायला सुरुवात होते. तेथून बाष्प घेऊन येणारे शक्तिशाली वारे भारतामध्ये प्रचंड पाऊस पाडतात. Happy Monsoon India शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासानुसार ८० लाख वर्षांपासून मान्सून पृथ्वीवर कार्यरत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. भारतामधील एकूण लोकसंख्येपैकी ६० टक्के लोक हे कृषी क्षेत्राशी निगडित अर्थव्यवस्थेवर अवलंबून आहेत. भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये त्यांचा वाटा जवळपास १९ टक्के एवढा आहे. शेती आणि त्याच्याशी संबधित रोजगारावर देशामधील अर्धी लोकसंख्या अवलंबून आहे. त्यामुळे पाऊस कमी जास्त होण्याचा थेट परिणाम या लोकसंख्येवर म्हणजेच पर्यायाने देशाच्या अर्थव्यवस्थेवर होतो. मान्सून हा भारतीय लोकजीवनाचा आणि अर्थव्यवस्थेचाही अविभाज्य घटक आहे.
 
 
Happy Monsoon India अरबी समुद्र, हिंद महासागर, बंगालचा उपसागर अशा तिन्ही बाजूंनी असलेले समुद्र व ईशान्येपासून उत्तरेपर्यंत पसरलेल्या पर्वतरांगांमुळे भारताला मान्सूनची देणगी मिळाली आहे. आधी म्हटल्याप्रमाणे पाऊस हा जरी विविध घटकांवर अवलंबून असला तरी पावसाने संपूर्ण देशाकडे पाठ फिरविली असे कधीच होत नाही. देशामधील महागाई नियंत्रित ठेवण्यासही हा पाऊस महत्त्वाची भूमिका बजावतो. महागाईवर परिणाम करणारा सर्वात महत्त्वाचा घटक म्हणून शेतीकडे बघितले जाते. शेतमालाचे उत्पादन चांगले झाले तर भाव नियंत्रणामध्ये राहतात. Happy Monsoon India भारताच्या बहुतांश भागातील वार्षिक पर्जन्यमानापैकी जवळपास ७५ टक्के वाटा हा जून ते सप्टेंबर मान्सून काळातील पावसाचा असतो. दीर्घकालीन सरासरीपेक्षा १० टक्के कमी पाऊस झाला तरी त्याचा एकूण देशांतर्गत उत्पादनावर दोन ते तीन टक्के परिणाम होतो. देशाची जवळपास अर्धी लोकसंख्या कृषी क्षेत्रावर आधारित असल्याने आपल्या देशाचे आर्थिक गणित मान्सूनवर अवलंबून असते.
९८८१७१७८५६