निवडणूक व हिंदू मानसिकता

Loksabha-Hindutva ध्येय हे उच्च ठेवत असतो

    दिनांक :10-Jun-2024
Total Views |
कानोसा
 
 
- अमोल पुसदकर
 
 
 
Loksabha-Hindutva नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत. भारतीय जनता पार्टीला अपेक्षेप्रमाणे जागा मिळालेल्या नाही, हे वास्तव आहे. मी एका ठिकाणी वाचले होते की नापास झालेले विद्यार्थी मेरिटमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्याला कमी गुण मिळाल्यामुळे फटाके फोडत आहेत. सध्या विरोधकांची हीच परिस्थिती आहे. Loksabha-Hindutva भाजपाला अपेक्षेएवढ्या जागा मिळाल्या नाही परंतु अपेक्षा म्हणजे काय, हे पण समजून घेतले पाहिजे. त्या कोणी ठरविल्या होत्या, हे पण समजून घेतले पाहिजे. Loksabha-Hindutva बरेचदा आपण विद्यार्थ्याला जर त्याने प्रथम श्रेणीत उत्तीर्ण व्हावे, असे वाटत असेल तर त्याला म्हणतो की तुला कमीत कमी ७५ टक्के तरी गुण मिळाले पाहिजेत. ७५ टक्के मिळाले पाहिजे असे वाटत असेल तर त्याला म्हणतो की तुला ९० च्या खाली गुण मिळता कामा नये. म्हणजे नेहमीच आपण अपेक्षा किंवा ध्येय हे उच्च ठेवत असतो. मोदींनी कार्यकर्त्यांसमोर मोठे ध्येय ठेवले.
 
 
 

Loksabha-Hindutva 
 
 
 
मागील लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला ३०३ जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे ३५० जागा भारतीय जनता पक्षाच्या व ५० पेक्षा अधिक जागा इतर मित्रपक्षांच्या असे मिळून ४०० पार हा नारा देण्यात आला. ४०० पार ही घोषणा सुद्धा वादाच्या भोवऱ्यात सापडली. Loksabha-Hindutva विरोधकांनी, मोदींना संविधान बदलण्यासाठी ४०० जागा हव्या आहेत, ते आरक्षण समाप्त करतील, अशा पद्धतीचा प्रचार केला. या प्रचाराने जोर धरला. सर्वत्र लोकांमध्ये हाच विषय घुमू लागला. भारतीय जनता पक्षाला याचा सुगावा लागतपर्यंत हा विषय देशव्यापी झालेला होता. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणांमध्ये या अपप्रचाराला खोडून काढण्याचा प्रयत्न केला. परंतु तो यशस्वी झाला, असे वाटत नाही. उमेदवार निवडतानासुद्धा नेतृत्वाच्या मनातील उमेदवार आणि लोकांच्या मनातील उमेदवार यामध्ये जर खूप फरक असेल तर सत्ताधारी पक्षाला पराभवाचा सामना करावा लागू शकतो, हा सुद्धा संदेश या निवडणुकीतून आपल्याला मिळालेला आहे. Loksabha-Hindutva बऱ्याच ठिकाणचे उमेदवार यावेळी चुकले. महायुतीमध्ये कोणती जागा कोणाकडे याचा निर्णय अखेरपर्यंत झाला नाही. त्यामुळे कोणी प्रचार करायचा आणि कोणी नाही, याच्याबद्दलचा निर्णय शेवटपर्यंत झाला नाही. त्याचाही परिणाम बऱ्याच ठिकाणी झालेला आहे.
 
 
 
ज्यावेळेस आपण मागील उमेदवारालाच पुन्हा संधी देत असतो त्यावेळेस तो जिंकून येऊ शकतो किंवा नाही त्याच्या जागी दुसरा कोणता उमेदवार देता येईल का, याच्याबद्दलचा निर्णय मात्र फार पूर्वीच व्हायला पाहिजे. भाजपाचे काही उमेदवार जे पुन्हा लढले व ते निवडून येऊ शकले नाही. यातून काहीतरी बोध नक्कीच घेतला पाहिजे. Loksabha-Hindutva मुसलमान समाज नेहमी संघटित असतो. तो मतदान करताना मशिदीमधून आलेल्या आदेशानुसार, फतव्यानुसार मतदान करीत असतो. त्यांच्या बायका, तरुण मुले, वृद्ध प्रत्येकच व्यक्ती हिरिरीने मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावत असतात. त्यांचे मतदान हे नेहमीच त्यांच्या धर्माकरिता कोणते सरकार अधिक सकारात्मक आहे याप्रमाणे केले जाते. भाजपाला हरवू शकणारा उमेदवार जर काँग्रेसचा असेल तर ते काँग्रेसला मतदान करतात. समाजवादी पार्टीचा असेल तर त्याला मतदान करतात. Loksabha-Hindutva एखादा मुस्लिम उमेदवार उभा असेल परंतु जर तो कमकुवत असेल, अपक्ष असेल व तो भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला हरवू शकणारा नसेल तर सध्याच्या परिस्थितीतील जागृत मुस्लिम मतदार हा त्याला मतदान करीत नाही तर भाजपाला पराभूत करू शकणाऱ्या उमेदवारालाच मतदान करतो. यावरून हिंदू समाजाने बोध घेण्याची आवश्यकता आहे.
 
 
 
परंतु, हिंदू समाज मात्र धर्माप्रमाणे मतदान करीत नाही. त्याला मराठा म्हणून हाक दिली तर तो ओ देतो, त्याला कुणबी म्हणून हाक दिली तर तो ओ देतो, परंतु त्याला हिंदू म्हणून हाक दिली तर तो प्रतिसाद देत नाही. तो जातीप्रमाणे मतदान करतो. रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी हिंदू म्हणून एकत्रित येणारा समाज मतदानाच्या वेळी हिंदू म्हणून मतदान करीत नाही. तर तो अमक्या समाजाचा म्हणून मतदान करतो. ही वस्तुस्थिती आहे. Loksabha-Hindutva परंतु, हिंदू समाजाने हे लक्षात ठेवावे की पुढील वीस वर्षांनंतर तुम्ही तुमचा पंतप्रधानसुद्धा ठरवू शकणार नाही. कारण, हिंदू या देशांमध्ये अल्पसंख्य होत चाललेले आहेत. इतर धर्मीयांची संख्या वाढते आहे. आज तुम्हाला मोदींना निवडण्याचे स्वातंत्र्य आहे. उद्या तुमची इच्छा असूनही तुमच्या इच्छेप्रमाणे पंतप्रधान तुम्ही निवडू शकणार नाही. हे जर व्हावे असे वाटत असेल तर लोकसंख्या नियंत्रण विधेयक आले पाहिजे. ते आणू शकणाऱ्या माणसालाच जर आपण पंगू बनवून टाकत असेल तर मग कोण काय करणार? आपले दुर्दैव आहे, असेच म्हणावे लागेल. ३७० कलम निष्प्रभ करणे, राम मंदिराचे निर्माण, नागरिकता संशोधन विधेयक असे अत्यंत परिणामकारक ऐतिहासिक निर्णय मोदी सरकारने घेतले होते.
 
 
 
Loksabha-Hindutva वास्तविकत: यांच्याकडे पाहूनच संपूर्ण देशातला हिंदू समाज संघटित व्हायला पाहिजे होता. काहीही करून मोदी बहुमताने पंतप्रधान झाले पाहिजे यासाठी प्रयत्न केला गेला पाहिजे होता. परंतु, वास्तविकता काय आहे? धर्म निवडणुकीच्या आखाड्यामध्ये नेहमीच पराभूत होतो आणि जात नेहमीच जिंकते. हिंदू म्हणून याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. हिंदू म्हणून लोक कधी एकत्र येणार, हा प्रश्न आहे. हिंदूंची व्होेट बँक कधी तयार होणार, हासुद्धा प्रश्न आहे. कारण, मुसलमानांची लोकसंख्या वाढतच आहे. Loksabha-Hindutva अजून वीस वर्षांनी होणाऱ्या निवडणुकांमध्ये त्यांची एक गठ्ठा मतं देशाचा पंतप्रधान ठरवतील. आता मोदी कसेबसे पंतप्रधान होत आहेत परंतु असेच सुरू राहिले तर वीस वर्षांनी मोदींऐवजी दुसरा कोणीसुद्धा पंतप्रधान होऊ शकणार नाही. एकगठ्ठा मतदान करणारा मुस्लिम समाज निवडणुकीच्या आखाड्यात जातिपातीत विभागलेल्या हिंदू समाजाचा सहजपणे पराभव करू शकतो, हे लक्षात घेतले पाहिजे. हे समजेपर्यंत जर खूप कालावधी लागला तर वेळ हातची निघून जाईल, हेही लक्षात घेतले पाहिजे. Loksabha-Hindutva त्यामुळे हिंदू समाजाने जागरूक होणे व हिंदू म्हणून मतदान करणे गरजेचे आहे.