बस झाडावर आदळून तिघे जखमी

साकोली-नवेगावबांध मार्गावरील घटना

    दिनांक :10-Jun-2024
Total Views |
तभा वृत्तसेवा
साकोली, 
accident राज्य परिवहन महामंडळाच्या बस चालकाचे वळण मार्गावर चालकाचे नियंत्रण सूटले व बस झाडावर आदळली. या अपघातात चालकासह तिघेजण जखमी झाले. सदर घटना 9 जून रोजी सकाळी 9.15 वाजताच्या सुमारास साकोली-नवेगावबांध मार्गावर साखरा वळणावर घडली.
 

ksdbg 
 
साकोली आगाराची बस क्रमांक एमएच 07/सी 9079 ही साकोली येथून नवेगावबांध करिता 9 जून रोजी सकाळी 9.10 वाजता 6 प्रवासी घेवून निघाली होती. दरम्यान साकोली पासून जवळपास 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या साखरा गावाजवळील वळणावर अचानक समोरून दूसरे वाहन आले. यामुळे बस चालक परसराम पेंदाम (52) यांचे नियंत्रण सुटून बस झाडावर आदळली. यात चालकासह बसमधील प्रवासी तुषार जानकर (35), सूमन नागरीकर (47) रा.गोंदाडी हे जखमी झाले.accident सर्व जखमींना साकोली उपजिल्हा रुग्णालयात प्रथमोपचाराकरिता नेण्यात आले. पुढील उपचाराकरिता भंडारा जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. साकोली पोलिस स्टेशन प्रकरणाची नोंद करण्यात आली आहे