सरकार लागले कामाला

    दिनांक :11-Jun-2024
Total Views |
- अमित शाहंसह अनेक मंत्र्यांनी स्वीकारली सूत्रे

नवी दिल्ली, 
Amit Shah : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील रालोआ सरकारचे खातेवाटप सोमवारी जाहीर करण्यात आल्यानंतर मंगळवारी सकाळी गृहमंत्री अमित शाह, अर्थमंत्री निर्मला सीतारामन्, परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर, कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान, ऊर्जा मंत्री मनोहरलाल खट्टर, वस्त्रोद्योग मंत्री गिरिराजसिंह, संस्कृती आणि पर्यटन मंत्री गजेंद्रसिंह शेखावत, बंदर, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बांनंद सोनोवाल यांच्यासह बहुतांश मंत्र्यांनी आणि संबंधित खात्यांच्या राज्यमंत्री पदाची सूत्रे स्वीकारली. एवढेच नाही तर, रालोआ सरकार लगेच कामालाही लागले.
 
 
Amit shah
 
Amit Shah : अमित शाह यांनी गृहमंत्री पदासोबतच सहकारी मंत्री पदाचाही कार्यभार आज सकाळी स्वीकारला. पदभार स्वीकारण्यापूर्वी अमित शाह चाणक्यपुरी भागातील राष्ट्रीय पोलिस स्मारकात गेले आणि तेथे त्यांनी शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली. नॉर्थ ब्लॉकस्थित गृहमंत्रालयात गृहराज्यमंत्रीद्वय नित्यानंद राय तसेच बंडी संजयकुमार यांनी अमित शाह यांचे स्वागत केले.
 
 
Amit Shah : शिवराजसिंह चौहान यांनी आज सकाळी कृषी भवनात जात कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री म्हणून पदभार स्वीकारला. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी निर्माण भवनात आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री म्हणून पदाची सूत्रे स्वीकारली. अश्विनी वैष्णव यांनी शास्त्री भवनात माहिती आणि प्रसारण मंत्री म्हणून कार्यभार स्वीकारला. ज्योतिरादित्य शिंदे यांनी संचारभवनात दळणवळण मंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारली. डॉ. मनसुख मांडविया यांनी श्रम आणि रोजगार तसेच युवा कल्याण आणि क्रीडा मंत्री म्हणून पदभार घेतला. सांसदीय कामकाज मंत्री म्हणून किरेन रिजिजू यांनी आज कार्यभार स्वीकारला. त्यांच्यासोबत अर्जुनराम मेघवाल आणि एल. मुरुगन यांनीही रिजिजू यांच्या मंत्रालयात राज्यमंत्री म्हणून पदभार घेतला.