बांबर्डा भडशिवनी रस्त्यावरील प्रवाशांचा पावसाळ्यातील प्रवास ठरणार जीवघेणा

नदीसह नाल्यावरील पूल खचले, अपघाताची शयता

    दिनांक :11-Jun-2024
Total Views |
कारंजा लाड,
road accident बांबर्डा भडशिवनी या रस्त्यावरील सिंगणापूर जवळील कापसी नदीवरील सिमेंट पाईप असलेला पूल यंदाच्या पावसाळ्यातील पुरामुळे खचला होता. अशातच आता त्याखालील भरती संपूर्णपणे खाली कोसळल्याने कोणत्याही क्षणी हा पूल अर्धा अधिक खचण्याची शयता निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत संभाव्य अपघात देखील घडू शकतो. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने पावसाळ्यापूर्वी हा पूल दुरुस्त करावा अशी मागणी या रस्त्यावरील प्रवाशांकडून वारंवार करण्यात आली. मात्र, कुंभकर्णी निद्रावस्थेत असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग आली नाही त्यामुळे बांबर्डा बडशिवनी या रस्त्यावरील प्रवाशांचा पावसाळ्यातील प्रवास हा जीवघेणा ठरू शकतो.
 

dsfg 
 
 
बांबर्डा भडशिवनी हा ६ किलोमीटर अंतराचा रस्ता असून या रस्त्यावरील तीन नाल्यावर रपटे व कापसी नदीवर सिमेंट पाईप चा पूल आहे. यंदाच्या पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे या रस्त्यावरील नाल्यांना आणि नदीला मोठे पूर गेले त्यामुळे नाल्यावरील रपटे आणि नदीवरील पूल पुरात अर्धे अधिक वाहून गेले. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने यातील एका नाल्यावरील रपट्याची थातूरमातूर दुरुस्ती करण्यात आली. परंतु उर्वरित नाल्यावरील रपटे आणि नदीवरील असलेला पूल मात्र खचलेल्या अवस्थेतच आहे. अशा परिस्थितीत आता त्या खचलेल्या भागातील भरती खाली गेल्याने हे रपटे व पूल वरून जरी प्रथम दर्शनी चांगले दिसत असले तरी त्या खालील भरती गेल्याने कोणत्याही क्षणी पुलाचा आणि रपट्याचा अर्धा अधिक भाग खचण्याची शयता निर्माण झाली आहे. या रस्त्याने बांबर्डा व शिंगणापूर अशी दोन गावे तालुयाचे ठिकाणाला जोडली गेली आहे. त्यामुळे स्वाभाविकच या दोन्ही गावातील शेतकरी या रस्त्याने आपला शेतमाल कारंजा बाजार समितीत विकण्यासाठी आणतात.road accident त्यामुळे नेहमीच या रस्त्याने मालवाहतुकीच्या वाहनांची वर्दळ असते. पावसाळ्यातील पुरामुळे या रस्तवरील रपटे आणि पूल वाहून गेल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आली परंतु दुसरा पावसाळा सुरू होण्याच्या मार्गावर आहे तरी अद्याप पर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने दुरुस्तीसाठी प्रयत्न केले गेले नाही. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांचा पावसाळ्यातील प्रवास हा जीवघेणा ठरण्याची शयता नाकारता येत नाही.