मोफत बियाणे योजना अडकली ऑनलाईन प्रणालीत

खत खरेदीसाठी शेतकर्‍यांना दारोदार फिरण्याची पाळी

    दिनांक :11-Jun-2024
Total Views |
मानोरा, 
Free seed scheme खरिपाच्या पेरणीची लगबग लागली असताना अनेक शेतकर्‍यांजवळ पेरणीची सोय नाही. कारण शासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे अद्याप या शेतकर्‍यांचे सोयाबीन,कापूस, हरभरा विक्री अभावी घरातच पडून आहे.त्यामुळे बी - बियाणे, खते कोणी उधार देता का उधार ; असे म्हणण्याची वेळ शेतकर्‍यावर प्रशासकीय उदासीन धोरणामुळे आली आहे. दुसरीकडे मृग नक्षत्रातच पावसाचे आगमन होत असल्याने कृषी विभागाने तालुयात कापूस, सोयाबीन, तूर पिकाचे लागवड करण्याचे नियोजन केले आहे. ज्या शेतकर्‍यांनी कापूस, सोयाबीन तूर विकली आहे. अशा शेतकर्‍यांना पिकाचे चुकारे मिळलेले नाही. तर दुसरीकडे शेतकर्‍यावर एकापाठोपाठ एक संकट कोसळत आहेत. नापिकी बोंड त्यात कधी गारपीट तर कधी लाल्या हे संकट शेती पिकावर येत असल्याने शेती पिकाच्या उत्पादनात कमालीची घट झाली आहे. आधिच शेत पिकांना बाजार भाव मिळत नसल्याने आज शेतकर्‍यांना शेती पेरणीसाठी दारोदार भटकंती करावी लागत असल्याची खंत परिवर्तन शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकरी नेते मनोहर राठोड यांनी व्यक्त केली आहे.
 

cghfj 
 
मृग नक्षत्राचे पहिले पाऊस पडल्याने शेतकर्‍यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आहेत पण बी - बियाण्यासाठी कोणाचे दार ठोठवावे हि विवंचना शेतकर्‍याची आहे.दिवसेंदिवस शेतकरी कर्जबाजारी होत आहे. शेतकर्‍यांनी बँकेसह सावकारांकडून खाजगी कर्ज घेतले.कर्जाची परतफेड शेतीपिकावर झाली नाही. यामुळे दरवर्षी शेतकरी हवालदील होत आहे.सरकारची कर्जमाफी अजूनही काही शेतकर्‍यांपर्यंत पोहोचली नाही.अनेक शेतकर्‍यांच्या घरात कापूस, सोयाबीन पडून असल्याने भाववारीच्या आशेपाई सोयाबीन ४ हजार तर कापूस ६ हजारच्या वर कोणीही विचारायला तयार नसल्याने आता पेरणी करावी तर कशी ? या यक्ष प्रश्नांनी शेतकर्‍यांना ग्रासले आहे. पेरणीला पैसा आणायचा कुठून, उसणवारी पैसा देणार तरी कोण, हा प्रश्न आहे. शेतातील माल निघाल्यावर उसनवारी घेतलेल्या पैशाच्या परतीची बोली करावी लागते. शेतातील पीक निघेपर्यंत थांबेल तरी कोण हा प्रश्न सध्या शेतकर्‍यासमोर असून शासनाच्या मोफत बियाणे योजना पेरणी तोंडावर येऊनही ऑनलाइनच्या प्रणालीत अडकलेली असून महायुती व महाआघाडीच्या लोकप्रतिनिधीना केवळ विधानसभा व लोकसभा निवडणुकी कळापुरताच शेतकरी व शेती मुद्दा आठवतो का ? असा गंभीर प्रश्नही राठोड यांनी उपस्थित करत आता काळानुरूप शेतकर्‍यांनीही जागृत होणे गरजेचे आहे.Free seed scheme आपल्या न्याय हक्कासाठी रडायचे नाही तर लढायलची हाक दिली आहे. बोगस बी बियाणापासून शेतकर्‍यांना वाचविण्यासाठी कृषी प्रशासनाने जागरूक रहावे. यवतमाळ अकोला या लगतच्या जिल्ह्यात बोगस बियाण्याचा सुळसुळाट चालू असून, अनेक ठिकाणी बोगस बियाण्याचे तालुयात साठणूक झाली असल्याची चर्चा असून यावर कृषी विभागाने कसून चौकशी केल्यास शेतकर्‍यांना या बोगस बियाण्यातून वाचविता येईल.