आष्टी,
electric wires चामोर्शी तालुक्यातील चौडमपल्ली ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या सिंगणपल्ली गावात विद्युत खांबावरील तारा लोंबकाळल्याने अपघात व ग्रामस्थ्यांच्या जिवित्वास धोका निर्माण झाला आहे. याकडे मात्र संबधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. सिंगणपल्ली येथील स्ट्रीटलाईट पोलवरील विद्युत प्रवाह असलेल्या तारा लोंबकळत असतांना दिसत आहेत.
सध्या पावसाळयाचे दिवस असल्याने कधीही जोरदार पाऊस व वारा येवून लोंबकळलेल्या तारा जमिनवर पडू शकतात. लहान मुले व नागरिक या रस्त्यावरून नेहमी ये-जा करीत असतात. त्यामुळे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या गंभीर बाबीची दखल घेवून ग्रामपंचायत प्रशासन व महावितरण कंपनीने लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
सिंगणपल्ली या गावातील स्ट्रीट लाईटचे नवीन खांब टाकण्यात आले व या खांबांच्या तारा संबंधित ठेकेदाराने ओढल्या नसल्याने त्या लोंबकळत आहेत. याबाबत ग्रामपंचायत प्रशासनाला तोंडी माहिती दिली आहे. पण ग्रामपंचायत प्रशासन, महावितरण तथा संबंधित ठेकेदाराकडून लोंबकळत असलेल्या तारा ओढण्यात आल्या नाही.electric wires परिणामी लोंबकळत असलेल्या तारांमूळे ये-जा करणार्यांच्या जिवितास धोका निर्माण झाला असल्याचे ग्रामस्थ प्रभाकर बुरमवार यांनी सांगितले. याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी ग्रामसेवकास भ्रमणध्वनीवरुन संपर्क साधला असता त्यांनी फोन उचलला नाही.