साहित्यीक मुसळे हे मराठी माणूस व भाषेची ओळख : इंद्रजीत भालेराव

बाबाराव मुसळे यांचा अमृत महोत्सवी भव्य सत्कार

    दिनांक :11-Jun-2024
Total Views |
वाशीम, 
Indrajit Bhalerao जेष्ठ साहित्यीक बाबाराव मुसळे हे वयाच्या ७५ व्या वर्षीही साहित्य लिखाण करीत आहेत. त्यांनी आपले संपूर्ण जीवन साहित्य व शेतीला समर्पित केले आहे. शेतीची नाळ कायम जुळून त्यांनी साहित्य क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. माणसे जोडण्याची कला त्यांनी जोपासल्यामुळे आज त्यांच्या अमृत महोत्सवाला हजारोंचा जनसागर उपस्थित असून हीच त्यांची खरी कमाई आहे. मुसळे हे मराठी माणूस व भाषेची ओळख असून, वर्‍हाडी माणसाची शान असल्याचे प्रतिपादन जेष्ठ साहित्यीक इंद्रजीत भालेराव यांनी केले.
 

indrajit bhalerao 
 
स्थानिक स्वागत लॉन येथे बाबाराव मुसळे अमृत महोत्सव समिती, विदर्भ साहित्य संघ वाशीम शाखा, सावित्रीबाई पुले महिला महाविद्यालय, मुसळे परिवार ब्रम्हा यांच्याव्दारे श्री बाबाराव मुसळे अमृत महोत्सव समारंभाचे आयोजन १० जून रोजी करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. हरिभाऊ क्षिरसागर, सत्कामुर्ती बाबाराव मुसळे व आशाताई मुसळे, स्वागताध्यक्ष डॉ. हरिष बाहेती, विशेष अतिथी लोककवी डॉ. प्रा. इंद्रजित भालेराव, डॉ. रावसाहेब काळे, निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, शिक्षक आ. किरणराव सरनाईक, उद्योजक अविनाश जोगदंड उपस्थित होते. सर्वप्रथम बाबाराव मुसळे यांची पत्नी समवेत ग्रंथतुला करण्यात आली. सोबतच ग्रंथप्रदर्शन, ग्रंथ विक्रीचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तदनंतर क्रांतीज्योती सावित्रीबाई पुले व मुसळे यांच्या मायबाबा यांच्या प्रतिमेचे पुजन हार्रापण व दिपप्रज्वलन करण्यात आले. तद्नंतर मरणदशा, तुझी साद ओली, चाकोली व मातृरक्षा विशेष अंकाचे विमोचन करण्यात आले. मुसळे परिवारातील सदस्यांनी ७५ दिव्यांनी मुसळे दाम्पत्याचे औक्षण केले. अमृत महोत्सवी सत्कार समितीच्या वतीने स्वागताध्यक्ष डॉ. हरिष बाहेती, उपाध्यक्ष मोहन सिरसाट, जनार्धन बोरकर, प्रा. गजानन वाघ, विठ्ठल जोशी, निलेश सोमाणी, अविनाश पसारकर, डॉ.प्रा. प्रज्ञा क्षिरसागर, प्रा. डॉ. शुभांगी दामले, डॉ. विजय काळे यांच्याहस्ते सत्कारमुर्ती जेष्ठ साहित्यीक मुसळे यांना शाल, सन्मानचिन्ह व ७५ किलो गुलाब पुष्पांचा हार टाकून भव्य सत्कार करण्यात आला.Indrajit Bhalerao मातृरक्षाच्या वतीने दिगंबर इंगळे, निलेश सोमाणी व प्रा. गजानन वाघ यांच्याहस्ते मुसळे यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वागताध्यक्ष डॉ. हरीष बाहेती, परिचय साहित्यीक प्रा. मोहन सिरसाट, संचालन प्रा. गजानन वाघ, आभार हर्षा पसारकर यांनी केली. शेवटी आकांक्षा ठक्कर हिच्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाला मोठया संख्येने साहित्यीक महिला पुरूष व मुसळे परिवारातील सदस्य उपस्थित होते.