ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष मधुसूदन कुळकर्णी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित

    दिनांक :11-Jun-2024
Total Views |
बुलढाणा, 
Madhusudan Kulkarni : महाराष्ट्रात विदर्भ ज्येष्ठ नागरिक संघाचे कार्य गेली अनेक वर्षे येथील जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष तथा श्रीराम मारोती मंदिरचे उपाध्यक्ष मधुसूदन कुळकर्णी यांनी सामाजिक व आध्यात्मिक क्षेत्रामध्ये दिलेल्या योगदानाचा गौरव म्हणून दि. 9 जून रोजी रविवारी येवला येथे संपन्न झालेल्या अखिल भारतीय मराठी संस्कृत साहित्य संमेलनामध्ये लोकमान्य टिळक जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
 
 
Madhusudan Kulkarni
 
 
लोकमान्य संस्कृत विद्यापीठातर्फे कुलपति मनोहरशास्त्री सुकेणकर यांचे हस्ते आणि डॉ राजेश सरकार संस्कृत विभाग प्रमुख बनारस हिंदु विद्यापीठ वाराणसी यांचे प्रमुख उपस्थितीत हा जीवनगौरव सर्वोच्च पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. या समारंभाचे आयोजन व सूत्र संचालन पंडित डॉ प्रसाद शास्त्री कुलकर्णी यांनी केले.