शालिमार एक्स्प्रेसमधील एसी पुन्हा बंद

5 तास उशिराने धावली, प्रवाशांचा संताप

    दिनांक :11-Jun-2024
Total Views |
गोंदिया,
Shalimar Express : येथील रेल्वे स्थानकावर मुंबई एलटीटी शालिमार एक्स्प्रेसच्या कोचमधील एसी आज 11 जून रोजी बंद झाल्याने प्रवाशांनी रेल्वे प्रशासनावर संताप व्यक्त केला. यापुर्वीही 28 मे रोजी पाच कोचमधील एसी बंद पडल्या होत्या. जोपर्यंत एसी सुरू होणार नाहीत, तोपर्यंत गाडी पुढे जाऊ देणार नाही, अशी भूमिका प्रवाशांनी घेतली होती. यामुळे येथील रेल्वेस्थानकावर तणावाची स्थिती उद्भवली. संबंधित तंत्रज्ञानी तांत्रीक दोष शोधून एसी यंत्रणा पुर्वत केली. यानंतर 4.5 वाजता गाडी पुढच्या प्रवासाला निघाली.
 
 
AC
 
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेस गाडी क्रमांक 18030 च्या काही एसी कोचमध्ये आमगाव रेल्वेस्थाकादरम्यान एसी यंत्रणेत बिघाड आला. याची माहिती प्रवाशांनी संबंधित अधिकार्‍यांना दिली. मात्र दखल घेण्यात आली नाही. आधीच उन्हाळ्याचे दिवस असल्याने उकाड्याने नागरिक त्रस्त आहेत. त्यातच कोचमधील एसी बंद पडल्याने प्रवाशांसह लहान मुलांचे हाल झाले. त्यामुळे प्रवाशांमध्ये रोष वाढला. गाडी गोंदिया स्थानकावर पोहचताच प्रवाशांनी रेल्व अधिकार्‍यांना धारेवर धरले. कर्मचार्‍यांनी नागपूर स्थानकात एसी सुरू होतील, असे सांगितले. जोपर्यंत एसी सुरू होणार नाही, तापर्यंत गाडी पुढे जाऊ देणार नाही, अशी भूमिका प्रवाशांनी घेतली. तंत्रज्ञला गाडीत पाठवून एसी सुरू करण्याची ग्वाही अधिकार्‍यांंनी प्रवाशांना दिली. तंत्रज्ञांना एसी यंत्रणा सुरळीत करण्यात यश आले आणि रेल्वे अधिकारी, कर्मचारी, प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास घेतला. यानंतर गाडी संध्याकाळी 4.05 वाजता पुढच्या प्रवासाला निघाली.
 
 
गाड्यांना विलंब
 
 
गोंदिया रेल्वेस्थानकाच्या फलाट क्रमांक 3 वर शालिमार एक्स्प्रेस मधील प्रवाशांनी बंद एसीवरून तासभर गाडी रोखून धरली. त्यामुळे या फलाटवर येणार्‍या काही गाड्या विलंबाने धावल्या. शालिमार एक्सप्रेसही तब्बल 5 तास विलंबाने धावत होती. गोंदिया रेल्वे स्थानकावर पोहचण्याची नियोजित वेळ सकाळी 10.5 तर सुटण्याची वेळ 10.15 आहे. दुपारी 3.21 वाजता गाडी गोंदिया स्थानकावर पोहचली. 4.05 वाजता रवाना झाली. हावडा-मुंबई मार्गावरील अनेक गाड्या उशिराने धावत आहेत. अनेक महिन्यांपासून समस्या कायम आहे. यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.