सुनीता विल्यम्स यांचा अंतराळातील मुक्काम वाढणार

    दिनांक :11-Jun-2024
Total Views |
- अंतराळ केंद्रावर आढळला स्पेस बग
 
वॉशिंग्टन,
भारतीय वंशाच्या अंतराळवीर Sunita Williams सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर यांचा अंतराळातील मुक्काम वाढला आहे. हे दोघेही मंगळवार 18 जूनपर्यंत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर राहणार आहेत. आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रावर एक ‘स्पेस बग’ आढळला आहे. त्यामुळे सुनीता विल्यम्स व अंतराळवीरांना समस्या निर्माण होऊ शकते. या कारणाने अंतराळयानाचा मुक्काम वाढवण्यात आला आहे.
 
 
Sunita Williams
 
अंतराळात शास्त्रज्ञांना ‘एंटेरोबॅक्टर बुगांडेन्सिस’ नावाचा बहु-औषध प्रतिरोधक जीवाणू सापडला आहे. जो आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्राच्या बंद वातावरणात विकसित झाला आहे. तो अधिक शक्तिशाली बनला आहे. तो बहु-औषध प्रतिरोधक असल्याने त्याला अनेकदा ‘सुपरबग’ म्हणतात. हा जीवाणू श्वसन प्रणालीला संक्रमित करतो. त्यामुळे बोईंग कंपनीच्या स्टारलायनर अंतराळयानाचा अंतराळातील मुक्काम वाढला आहे.
 
 
सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी अंतराळवीर बॅरी युजीन बुच विल्मोर 6 जून रोजी नवीन बोईंग स्टारलायनर अंतराळ यानातून आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रावर पोहोचले. दरम्यान, चाचणी केल्यानंतर पृथ्वीवर परत येण्यापूर्वी ते कमी पृथ्वीच्या परिभ‘मण प्रयोगशाळेत आणखी एक आठवडा घालवण्याची शक्यता आहे.
 
सुनीता विल्यम्स यांनी इतिहास घडवला
Sunita Williams : सुनीता आणि त्यांच्या एका सहकार्‍याने बोईंग कंपनीच्या स्टारलायनर अंतराळयानातून यशस्वी उड्डाण केले. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जाणारे पहिले सदस्य बनून सुनीता विल्यम्स यांनी नवीन इतिहास घडवला. विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना घेऊन जाणारी बोईंगची क्रू फ्लाइट चाचणी मोहीम अनेक विलंबानंतर फ्लोरिडामधील केप कॅनाव्हेरल स्पेस फोर्स स्टेशनवरून प्रक्षेपित करण्यात आली.