दिग्रसला तहसीलदार अर्जुन पावरा रुजू

11 Jun 2024 20:21:28
दिग्रस :
दिग्रस तहसील कार्यालयाचा पदभार कोणाकडे तरी सोपवायचे मात्र सोमवार, 10 जूनपासून Tehsildar Arjun Pawara तहसीलदारपदी अर्जुन पावरा यांची नियुक्ती झाली आहे, तसे पत्र तहसील कार्यालयाला प्राप्त झाले आहे. पावरा यांनी आपल्या शैक्षणिक जीवनात मुंबई येथून बीएएमएसची वैद्यकीय पदवी प्राप्त करून 2012 ते 2017 या कार्यकाळात त्यांनी वैद्यकीय सेवा पुरविली.
 
 
y11Jun-Arjun-Pavara
 
Tehsildar Arjun Pawara : ते 2022 ते 2023 या कालावधीत कक्ष अधिकारी, जलसंपदा विभाग मंत्रालय मुंबई येथे कार्यरत होते. उपजिल्हाधिकारी म्हणून वाशिम जिल्ह्यात प्रशिक्षण पूर्ण केले. त्यानंतर 3 मे पासून दिग्रस येथे अतिरिक्त तहसीलदार म्हणून कार्यरत होते. सोमवार, 10 जून रोजी त्यांची येथील तहसीलदारपदी करण्यात आल्याबाबत पत्र यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयातून प्राप्त झाले. पुढील कालावधीसाठी तहसीलदार दिग्रस म्हणून ते कार्यभार सांभाळतील.
 
Powered By Sangraha 9.0