वाशीम येथे साडी वॉकेथानला महिलांचा प्रतिसाद

    दिनांक :11-Jun-2024
Total Views |
वाशीम,
Saree Walkathon तहसील माहेश्वरी महिला संघटनेच्या द्वारे आयोजित साडी वॉकेथान कार्यक्रम पार पडला. १० जून रोजी सकाळी ९.३० वाजता महेश भवन येथे श्री महेश पार्वतीचे पूजन करून महिलांनी महेश भवनाच्या प्रांगणात पिवळी साडी परिधान करून तसेच लाल दुपट्टा घेऊन माहेश्वरी समाजाची एकात्मता, एकजूट, परंपरा आणि संस्कृती चा संदेश दिला. नवयुतींनी सुद्धा साडी नेसून परंपरा जोपासण्याची शपथ घेतली.
 

chj 
 
आपल्या परंपरा व संस्कृती ची जोपासना आपणच केली पाहिजे स्त्रियांनी स्वतःचे रक्षण स्वतःच केले पाहिजे, संत शिरोमणी मीराबाई, स्वतंत्र वीर क्रांतिकारी झाशीची राणी राणी लक्ष्मीबाई,अहिल्यादेवी, होळकर, भारताची पहिली महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले, रमाबाई आंबेडकर, इंदिरा गांधी, शूर वीर शिवबाला जन्म देणारी तसेच स्वराज्य स्थापनेची मार्गदर्शिका योद्धा राजमाता जिजाऊ, प्रतिभाताई पाटील, अनेक शूर वीरांगणाची आठवण करून देत आजचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.Saree Walkathon उपस्थित सर्व माहेश्वरी वरिष्ठ महिला मंडळ, माहेश्वरी विदर्भ महिला संघटन, माहेश्वरी बहुमंडळ संघटन, तसेच माहेश्वरी नवयुती संघटन , हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वाशीम तहसील माहेश्वरी महिला संघटनाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उस्फूर्त सहभाग नोंदविला साडी ही आमची परंपरा आहे ती आपण जपलीच पाहिजे.