विहिरीत गोटा पडल्याने कामगाराचा मृत्यू

    दिनांक :11-Jun-2024
Total Views |
कारंजा (घा.) ,
accident Marathi News : तालुक्यातील पिपरी येथील हरिश्‍चंद्र देशमुख यांच्या शेतातील विहिरीचे खोदकाम सुरू असताना अचानक विहिरीच्या काठावरील गोटा डोक्यावर पडल्याने एका कामगाराचा मृत्यू झाला. तर तीन कामगार थोडक्यात बचावले.
 
 
 
kuva
 
 
किसना भगवान डोंगरे (57) रा. रानवाडी असे मृतकाचे नाव आहे. विहिरी खोदकाम करण्यासाठी मजूर म्हणून ते काम करीत होते. आज मंगळवार 11 रोजी सकाळी हरिश्‍चंद्र देशमुख यांच्या शेतातील विहिरीचे खोदकाम करण्यासाठी चार कामगार विहिरीत उतरून काम करीत होते. यावेळी किसन डोंगरे यांच्या अंगावर आणि डोक्यावर विहिरीच्या काठावरील दगड अंगावर पडल्याने गंभीर जखमी झाले. यावेळी उपस्थित कामगारांनी त्याला मलब्याचा बाहेर काढून कारंजा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणाची नोंद कारंजा पोलिसांनी घेतली आहे.