मुंबई विमानतळावर 33 किलो सोने जप्त

    दिनांक :11-Jun-2024
Total Views |
मुंबई :  सीमाशुल्क विभागाने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर दोन विदेशी महिलांच्या अंतर्वस्त्रात तसेच सामानत लपवून ठेवलेले 32.79 किलो gold Seize सोने जप्त केले. याचे मूल्य 19.15 कोटी रुपये आहे, असे एका अधिकार्‍याने मंगळवारी सांगितले.
 
 
Gold
 
सोमवारी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरल्यानंतर आफ्रिकी देशांमधून आलेल्या दोन महिलांची संशयाच्या आधारे झडती घेण्यात आली. दोन्ही घटनांमध्ये अंतर्वस्त्रात तसेच सामानात लपवून ठेवलेले gold Seize सोने सापडले. या महिलांना अटक करण्यात आली असून, पुढील चौकशी सुरू आहे.