संत गुलाबराव महाराजांच्या पालखीचे प्रस्थान

21 जुलैला पंढरपुरात पोहचणार

    दिनांक :12-Jun-2024
Total Views |
चांदूरबाजार, 
Sant Gulabrao Maharaj's palanquin : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे होणार्‍या सोहळ्याकरिता श्री संत गुलाबराव महाराजांची पालखी दिंडीचे श्रीक्षेत्र भक्तीधाम चांदूरबाजार येथून पंढरपूरकडे प्रस्थान झाले आहे.
 
 
 
PALAKHI
 
 
संत गुलाबराव महाराज पालखी प्रस्थान सोहळा भक्तिधाम येथे ज्येष्ठ शुद्ध. 4 सोमवार 10 जूनला आयोजित करण्यात आला होता. टाळ, मृदुंग व हरिभजनाच्या गजरात पालखीने चांदूरबाजार शहरातून मार्गक्रमण केले. पालखी 11 जूनला सकाळी बोराळामार्गे अमरावतीकडे रवाना झाली. पालखीमध्ये 150 ते 200 वारकरी भक्तांचा सहभाग असून महिलांचा मोठा सहभाग आहे. पालखीचा अमरावती येथे तीन दिवस मुक्काम राहणार आहे. या दरम्यान पालखी गाडगे नगर, रुक्मिणी नगर, न्यू गणेश कॉलनी, साई मंदिर बडनेरा रोड असा पालखी दिंडीचा प्रवास राहणार आहे. पुढे पालखी बडनेरामार्गे महाराजांचे आजोळ लोणी टाकळी, कारंजा, मंगरूळ नाथ, वाशीम, हिंगोली, औंढा नागनाथ, परळी वैद्यनाथ, अंबेजोगाई, बार्शी, आरन, क्षेत्र पंढरपूर येथे पोहचेल. मार्गात येणार्‍या सर्व गावांमध्ये माऊली भक्ताकडून पालखीचे जोरदार स्वागत होणार आहे. एकूण 30 दिवसाचा पालखीचा पायदळ प्रवास असून 21 जुलै रोजी पालखी पंढरपूर येथे गुलाबराव महाराजांच्या मंदिरात पोहचेल.