मृग नक्षत्राला सुरुवात, पावसाची मात्र प्रतीक्षा

    दिनांक :12-Jun-2024
Total Views |
गोंदिया, 
Mrig Nakshatra : मृग नक्षत्राला सुरूवात झाली असून अद्याप मान्सून दाखल झालेला नाही. उष्णतेमुळे हैराण झालेल्या नागरिकांसह शेतकर्‍यांना पेरणीसाठी आता पावसाची प्रतीक्षा लागली आहे.
 
 
mrug
 
 
भारतीय पंचांग शास्त्राच्या कालगणनेनुसार भारतीय उपखंडातील पावसाळ्याच्या चार महिन्यांना एकूण बारा नक्षत्रांमध्ये विभागण्यात आले आहे. ती बारा नक्षत्रे, रोहिणी, मृग, आर्द्रा, पुनर्वसु, पुण्य, आश्लेषा, मघा, पूर्वा, उत्तरा, हस्त, चित्रा, स्वाती याप्रमाणे आहेत. मृग या नक्षत्राला सुरुवात झाली आहे. रोहिणी या नक्षत्रापासून देशात सागरी किनारपट्टीत पावसाळ्याला सुरूवात होते. तर मृग नक्षत्र शेतकर्‍यांना पावसाचा दिलासा देणारे नक्षत्र म्हणून ओळखले जाते. हवामानशास्त्र विभागाने यावर्षी पाऊस वेळेवर हजेरी लावणार तसेच पावसाळा समाधानकारक राहील, असा अदांज यापूर्वीच वर्तविला आहे. मृग नक्षत्राला प्रारंभ होवून पाच दिवस लोटले. मात्र, पावसाने अपेक्षित हजेरी लावली नाही. मृगाचा अंदाज काढण्यासाठी दरवर्षी शेतकरी पंचांग पाहतात. याच अंदाजावर शेतकरी विश्वास ठेवून शेतीत पेरणी करतात. खरीप हंगामात त्या-त्या नक्षत्राचे वाहन शेतकर्‍यांच्या जीवनाचे सुखदुःखाचे चक‘ सुरू ठेवते, असा समज आहे. नक्षत्र हे चार चरणात विभागण्यात आले आहे. प्रत्येक चरण हे 3 ते 4 दिवसांचे असते. पंचांग शास्त्रानुसार वर्तविण्यात आलेल्या पावसाच्या अंदाजानुसार सूर्य रोहिणी नक्षत्रात प्रवेश करतो व मृग नक्षत्राची सुरूवात होते. शेतकर्‍यांनी हवामानाचा अंदाज, प्रत्यक्ष परिस्थिती अनुभवातूनच योग्य तो निर्णय घेऊनच पेरण्या कराव्यात असा तज्ज्ञांचा स‘ा आहे.