श्रद्धाळूच्या हत्याकांडाचा विहींप बजरंग दलाकडून तीव्र निषेध

13 Jun 2024 17:13:16
मानोरा, 
Bajrang Dal तहसीलदार यांच्यामार्फत देशाच्या राष्ट्रपती यांना विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी लेखी निवेदन देऊन काश्मीर मधील वैष्णोदेवी येथे तीर्थधामासाठी गेलेल्या भाविक भक्तांवर आतंकवादी मानसिकता असलेल्यांनी गोळीबार करून घडविलेल्या हत्याकांडाचा तीव्र निषेध केला आहे.
 
 
XFGHG
 
काश्मीरमधील वैष्णोदेवी कटरा ते शिवखोडा येथे जात असताना आतंकवादी समर्थक शेजारी राष्ट्राच्या हस्तक आतंकवाद्यांनी कृरतेची परीसीमा गाठून बसमधील श्रद्धाळूवर अंदाधुंद गोळीबार केला, ज्यामध्ये बस चालकाला गोळी लागल्याने बस दरीत कोसळून आणि गोळ्यांच्या वर्षावात येऊन निष्पाप भाविक भक्तांचा दुर्दैवी मृत्यू झाला. शत्रू राष्ट्राकडून केंद्र सरकारच्या शपथविधी दिनी भाविक भक्तांचा हत्याकांड घडवून देशाच्या सार्वभौमत्व आणि अखंडत्वाला आव्हान दिले जात असल्याची खदखद विश्व हिंदू परिषद अंतर्गत बजरंग दलाच्या वतिने व्यक्त करण्यात आली आहे. ५३ सीटर ही बस चालकाला गोळी लागून खड्ड्यात पडल्याने यातील १० भाविक गोळ्या लागून ठार झाले तर इतर ४१ श्रद्धाळू गंभीर जखमी झाले होते.Bajrang Dal लष्करी गणवेशातील आतंकवाद्यांनी निष्पाप श्रद्धाळूंवर केलेल्या अंदाधुंद गोळीबाराचा तीव्र निषेधाचे निवेदन विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचे पदाधिकारी यांनी देशाचा राष्ट्रपती महामहीम द्रौपदी मुर्मू यांना तालुका प्रशासनाच्या मार्फत देऊन ह्या घटने विषयी तीव्र आक्रोश व्यक्त केला आहे.
Powered By Sangraha 9.0