शेगांवचा राणा माहेरी निघाला !

13 Jun 2024 18:17:41
बुलढाणा ,
वारकरी व्हा gajanan maharaj palkhi आणि प्रत्यक्ष डोळ्याने पंढरी पहा. बाकीचे साधने काय करायची आहे?सर्व काही फळ यानेच मिळते.असे केल्याने अभिमान नाहीसा होतो आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात. तुकाराम महाराज म्हणतात डोळ्यांमध्ये सावळा विठ्ठल बसून राहतो त्यामुळे सर्वत्र त्याचाच प्रत्येय येतो.  सकाळी ७ वा. शेगाव येथून श्री संत गजानन महाराजांची पालखी मंदिरामधून ७०० वारकऱ्यांसह हजारो भाविक भक्तांच्या सहभागाने राजवैभवी थाटात आषाढी एकादशी महोत्सवानिमित्त श्री क्षेत्र पंढरपूर कडे प्रस्थान केले आहे. संतनगरीत श्रींच्या पालखीच्या निमित्ताने टाळ मृदंगासह हरिनामाचा नामघोष संत नगरी दुमदुमली आहे. आज गुरुवार रोजी वारीला येणारे भाविक व विदर्भ, खान्देशातील, मराठवाडा, मुंबई, पुणे, नागपूर,येथील श्रींचे भाविक आपल्या श्री गजानन माऊली श्री क्षेत्र पंढरपूर आषाढी एकादशीच्या वारीला माऊली जात असल्याने माऊली दर्शन घेऊन श्री क्षेत्र नागझरी येथे पर्यंत पायीं वारी करुन माऊलीच्या पालखीला निरोप दिला.
 
 

gajanan maharaj pandharpur 
श्रींच्या पालखी gajanan maharaj palkhi मार्गावर आकर्षक अशा रांगोळी काढण्यात आले तर शहरातील सेवाभावी संस्थांनाच्या वतीने,चहा,पाणी, मंठा ठिकठिकाणी व्यवस्था करण्यात आली होती.  श्रीं ची पालखी अकोला, वाडेगाव, पातूर, डव्हा, रिसोड, परमणी, परळी वैजनाथ,उस्मानाबाद, तूळजापूर, सोलापूर या मार्गाने ३३ दिवसा पायीवारी करीत एकूण ७५० किलोमिटर प्रवास करती दि.१५ जुलै रोजी श्री क्षेत्र पंढरपूर येथे श्रींच्या पालखी मुक्कामास पोहचेल. ५ दिवसापर्यंत श्री क्षेत्र पंढरपूर येथे पालखीचा मुक्कामास राहील. आणि आषाढी एकादशी सोहळा व काला आटोपल्यावर दि.२१ जुलै रोजी सकाळी श्रींची पालखी शेगांवकडे परतीच्या मार्गाने प्रस्थान करेल. दि ११ ऑगस्ट २०२४ रोजी पालखी खामगाव मार्गे संतनगरी शेगावला परत येईल.
पाऊले चालती पंढरीची वाट....
शेगांवचा gajanan maharaj palkhi राणा माहेरी निघाला !!
पाऊले चालती पंढरीची वाट...
श्री संत गजानन महाराज पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान
शेगांव दि.१३ प्रतिनिधी
होय होय वारकरी । पाहे पाहे रे पंढरी ॥१॥
काय करावीं साधनें । फळ अवघेचि येणें ॥ध्रु.॥
अभिमान नुरे । कोड अवघेचि पुरे ॥२॥
तुका म्हणे डोळां । विठो बैसला सांवळा ॥३॥
या अमृतमय अभंगवाणी प्रमाणे
 
श्रींची पालखी श्री क्षेत्र पंढरपूर
१) पायदळ वारीचे ५५ वे वर्ष
श्रींच्या पंढरपूरgajanan maharaj palkhi पालखी पायदळ वारीचे यंदा ५५ वे वर्ष आहे. श्री गजानन महाराज संस्थानने अखंडितपणे पायदळ वारीचीपरंपरा कायम ठेवली आहे. या पालखी सोबत शेकडो वारकरी भाविक पंढरपूरची वारी करत असतात. वारीमध्ये सहभागी सर्व वारकरी भक्त यांची सवीतोपरी व्यवस्था श्री संस्थान कडून करण्यात येते.
२) शहरातील या मार्गावरुन श्रींचे पालखीचे श्री क्षेत्र पंढरपूर पायी वारी करीता शुक्रवारी दि.१३ जुन २०२४ रोजी सकाळी ७.०० वा. श्री मंदिरातून प्रस्थान झाले.
श्रींची पालखी सेवाधारी प्रसादालयच्या उत्तर द्वारातून, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीराव फुले चौकातून, श्री संत सावता माळी चौक, श्री हरिहर मंदिर, तिन पुतळे परिसर भिम नगर, श्री क्षेत्र नागझरी रोडने श्री क्षेत्र पंढरपूर पायी वारीसाठी मार्गस्थ झाली आहे.
३) वारी...
संपुर्ण महाराष्ट्रालाgajanan maharaj palkhi वेड लावणारी एक अजब जादूगरी . . . प्रत्येकवर्षी न विसरता न चुकता आषाढीची वारी करून आपल्या लाडक्या पांडुरंगाचे दर्शन घेणे, त्याला डोळेभरून पाहाणे ही सच्च्या वारकयाची ओळख! खांद्यावर भगवी पताका घेउन उन्हातान्हात, पाऊसपाण्यात कशाकशाची तमा न बाळगता विठुरायाचे ओठावर अखंड नामस्मरण करत वारकरी पंढरीच्या वाटेवर निघतात . . . . शेकडो कोस पायी वारी करून फक्त विठोबाचे डोळे भरून दर्शन घेणे हेच या वारीचं साध्य!
४) वारी पेहराव..
वारी सोहळ्यामधील धवलवस्त्राधरी gajanan maharaj palkhi वारकरी म्हणजे जणू शुद्धतेचे आणि सात्विकतेचे प्रतिक आहेत. पांढरा सदरा, धोतर,डोक्यावर टोपी, कपाळावर बुक्का, गळ्यांत तुळशीची माळ असा वारकर्यांचा पेहराव आहे.
५) श्रींची पालखी श्री क्षेत्र पंढरपूर वारी करीता जात असतांना मार्गाने भेटणाऱ्या दिंड्यांमधील विणेकर्याना
श्री संस्थेव्दारा कापड प्रसादाचे वितरण करण्यात येते. तसेच दिंडीतील वारकऱ्यांकरीता औषधोपचार केल्या जातो.
६) श्रींची पालखी वेगवेगळ्या ९ जिल्ह्यांमधून मार्गक्रमण करीत शेगांव ते पंढरपूर प्रवास ३३ दिवसाचा ७५० कि.मी. चे अंतर पार करते.
७) श्रींचे पालखी सोबत ७०० वारकरी gajanan maharaj palkhi मंडळीसह २ अश्व व ९ वाहने आहेत.
८) वारकऱ्यांकरीता ऑम्बुलन्स गाडी डॉक्टर व सहकार्यासह आहे. याव्दारे श्री पालखीतील व वाटचालीमध्ये असणाऱ्या इतर दिंडीतील वारकऱ्यांकरीता औषधोपचार केल्या जातो.
९) वारकऱ्यांकरीता पाणी पिण्याकरीता टँकरची व्यवस्था आहे.
Powered By Sangraha 9.0