पीक कर्ज वाटपात इसाफ आणि डीसीबी बँकेचा भोपळा

14 Jun 2024 20:35:28
-  बँक इंडियाने केले सर्वाधिक पीककर्ज वाटप
 
वर्धा, 
crop loan : शेतकर्‍यांची खरीप हंगामाच्या तयारीची लगीनघाई सुरू आहे. बी-बियाणे, खते खरेदीसाठी पैशांची गरज असल्याने पीकर्ज काढण्यासाठी बँकेत धाव घेत आहे. परंतु, पीककर्ज वाटपसुद्धा कासवगतीने सुरू आहे. जिल्ह्यातील 21 बँकेच्या 151 राष्ट्रीयीकृत बँकेच्या शाखा असून या बँकेच्या माध्यमातून शेतकर्‍यांना पीककर्जाचे वितरण होणार आहे. परंतु, इसाफ आणि डीसीबी बँकेने अद्याप एकाही शेतकर्‍याला कर्ज वितरण न केल्याचे अहवालात नमूद आहे तर बँक ऑफ इंडियाच्या जिल्ह्यात 30 शाखा असून सर्वाधिक 8373.27 कोटींचे पीककर्ज वितरण करण्यात आले आहे.
 
 
pik karj
 
crop loan : शेतकर्‍यांना पीककर्जाचा मोठा आधार असतो. सातबारावर राष्ट्रीयीकृत बँकेकडून शेतकर्‍यांना अल्प व्याजदरात लागवडीसाठी पीककजर्र् दिले जाते. शेतकर्‍यांना सातबारावर जवळपास 3 लाखापर्यंत पीक कर्ज मिळते. यंदाच्या खरीप हंगामात 824 कोटी 38 लाख 58 हजार रुपयांच्या पीककर्जाचे उद्दिष्ट दिले आहे. 31 जूनपर्यंत जिल्ह्यातील 151 राष्ट्रीयीकृत बँकेतून 14 हजार 641 शेतकर्‍यांना 199 कोटी 43 लाख रुपयांचे कर्ज वितरण करण्यात आले आहे. तर धक्कादायक बाब म्हणजे, इसाफ बँकेची एक शाखा असून डीसीबी बँकेच्या 8 शाखा आहे. परंतु, या दोन्ही बँकांनी अद्याप एकाही शेतकर्‍याला कर्जाचे वितरण केले नाही. बँक ऑफ इंडियाच्या जिल्ह्यात 30 शाखा आहेत तर या बँकेने 6 हजार 240 शेतकर्‍यांना 83 कोटी 73 लाख रुपयांचे कर्ज वितरण केले आहे.
 
 
4,845 नवीन खातेधारक शेतकर्‍यांना कर्ज
यावर्षी बँकांकडे नवीन 4 हजार 845 खातेधारक शेतकरी आहेत. नवीन खातेधारक शेतकर्‍यांना 67 कोटी 79 लाख 72 हजार रुपयांचा कर्ज पुरवठा करण्यात आला आहे.
Powered By Sangraha 9.0