- चौघांवर गुन्हा दाखल
पुलगाव,
Pulgaon crime येथील शासकीय विश्रामगृहासमोरील फ्रेंड्स पान ठेल्यावर झालेल्या वादात पुलगाव पोलिसांनी दोन्ही गटावर गुन्हा दाखल केला. पहिल्या गटाचे इमरान इक़्कबाल शेख, शेख वसीम तर दुसर्या गटाचे विकास उर्फ विक्की पाखरे, आकाश चांडाले यांच्यावर प्रतिबंधित कारवाई करण्यात आली. ही घटना शुक्रवार 14 रोजी रात्री 11 वाजता घडली.
Pulgaon crime विक्की पाखरे आणि इमरान शेखचा भ्रमणध्वनीवर वाद झाला. त्यावेळी विक्की कारंजा (तळेगाव ) येथे होता. विक्कीने तेथूनच पुलगाव पोलिसला फोनवर सूचना दिली की, इमरान शेख मला फोनवर शिविगाळ करून धमकी देत आहे. मी पुलगावला पोहोचून त्याला भेटतो. विक्की येण्याआधीच पुलगाव पोलिस तेथे पोहचले. उपविभागीय पोलिस अधिकार्यांनी घटनास्थळ गाठून दोन्ही गटाचा आक्रोश पाहून वर्धा येथून दंगल नियंत्रण पथकाला पाचारण केले. यानंतर पुलगाव पोलिसांनी प्रकरण हाताळत दोन्ही गटांवर गुन्हा दाखल केला.