- महायुती एकत्र लढणार, आमची योजना तयार
मुंबई,
लोकसभा निवडणुकीत महायुतीविरोधात जनतेत संभ्रम निर्माण करून नकारात्मक वातावरण तयार करण्यात आले होते. मात्र, विधानसभेसाठी आम्ही खास योजना तयार केलि असून, 200 जागा जिंकण्याचे लक्ष्य असल्याचे शिवसेनेचे नेते व मंत्री Shambhuraj Desai शंभुराज देसाई यांनी शनिवारी सांगितले.
Shambhuraj Desai : पत्रपरिषदेला संबोधित करताना देसाई म्हणाले, विधानसभा निवडणुकीत महायुती एकत्रच लढणार आहे. जागावाटपासाठी समिती गठित करणार असून, यात तिन्ही पक्षांच्या नेत्यांचा समावेश असेल. जुलै महिन्याच्या 15 तारखेपर्यंत जागावाटपाचा निर्णय होईल. महाविकास आघाडीने एकमेकांची रस्सीखेच आणि कुरघोड्या कराव्या. लोकसभा निवडणुकीत ज्या काही गोष्टी आमच्या अनुभवाला आल्या, यात सुधारणा करून विधानसभा निवडणुकीत 200 जागा निवडून आणण्याचे लक्ष्य आम्ही ठेवले आहे. निकालानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी पदाधिकारी व आमदारांची बैठक घेतली होती. उमेदवारांच्या पराभवामागील कारणे, त्रूटींवर चर्चा झाली. लोकसभेमध्ये आम्हाला शिकायला मिळाले, झालेल्या चुका पुन्हा होणार नाही, याची काळजी घेतली जाईल.